शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

सब-ठेकेदारांना ५ कोटींचा गंडा

By admin | Updated: December 8, 2015 00:10 IST

वाळूज महानगर : बजाजनगरातील बीओटी तत्त्वावरील ड्रेनेजलाईन (एसटीपी) प्रकल्पात सब-ठेकेदारांची ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी

वाळूज महानगर : बजाजनगरातील बीओटी तत्त्वावरील ड्रेनेजलाईन (एसटीपी) प्रकल्पात सब-ठेकेदारांची ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईच्या भारत उद्योग लिमिटेड कंपनीच्या दोघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी नुकतीच अटक केली. न्यायालयाने त्यांना ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.एमआयडीसीने बजाजनगरात ड्रेनेजलाईनचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी एसटीपी प्रकल्प उभारण्याचा निर्णय २०११ मध्ये घेतला होता. १२ कोटी ६० लाख रुपये यासाठी खर्च करण्यात येणार होते. या कामाचे कंत्राट मुंबईच्या भारत उद्योग लिमिटेड या कंपनीला मिळाले होते. भारत उद्योग कंपनीने हे काम बेलापूर येथील एसडीडब्ल्यूडी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला दिले. एसडीडब्ल्यूने बजाजनगरातील अशोक शिनगारे यांच्या साई ग्रुप फर्मला करार करून हे काम दिले होते. काम सुरू असताना भारत उद्योग कंपनीच्या संचालकांनी परस्पर एमआयडीसीकडून पैसे घेतले. या प्रकल्पाचे काही काम केल्यानंतर साई ग्रुपचे अशोक शिनगारे यांनी भारत उद्योग कंपनीच्या संचालकांकडे बिलासाठी पाठपुरावा सुरू केला. मात्र, संचालकांनी टाळाटाळ केल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी शिनगारे यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन ५ कोटी १३ लाख ७८ हजार ४८५ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. आयुक्तांनी तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला. मुंबईच्या भारत उद्योग लिमिटेड या कंपनीचे संचालक सूर्यकांत कुकरेजा, राम झा, राजेंद्र यादव (सर्व रा. नवी मुंबई) व शेख अब्दुल (रा. वाशी नाका, चेम्बूर, मुंबई) या चौघांविरुद्ध १४ आॅक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेकडून हा गुन्हा नुकताच एमआयडीसी वाळूज ठाण्यात वर्ग करण्यात आला.