शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

संस्थेच्या वादात विद्यार्थ्यांची फरपट

By admin | Updated: June 30, 2014 00:36 IST

विलास भोसले , पाटोदा संस्थाचालकांच्या वादात राजीनामा दिलेल्या संस्थाध्यक्षाने इतरत्रच शाळा सुरू केली. सदर प्रकरण न्यायालयात गेल्याने न्यायालयाने चार मुलांना पालकांच्या स्वाधीन केले.

विलास भोसले , पाटोदासंस्थाचालकांच्या वादात राजीनामा दिलेल्या संस्थाध्यक्षाने इतरत्रच शाळा सुरू केली. सदर प्रकरण न्यायालयात गेल्याने न्यायालयाने चार मुलांना पालकांच्या स्वाधीन केले. संस्थेतील या प्रकारामुळे मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांची मात्र नाहक परवड होत आहे.पाटोदा तालुक्यातील तांबा राजुरी येथील विद्या विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे पाटोदा येथे मूकबधिर निवासी विद्यालय आहे. या संस्थेचे संस्थाध्यक्ष यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. यासंदर्भात धर्मादाय आयुक्त यांच्याकडे बदली अहवाल दिला असून, पुढील प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान सदरील राजीनामा दिलेल्या संस्थाध्यक्षाने काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन तांबा राजुरी येथे एका इमारतीत मूकबधिर शाळा सुरू केली. या संस्थेतील कर्मचारी सोमीनाथ तनपुरे काही पालकांकडे जाऊन विद्यार्थ्यांना तांबाराजुरी येथील शाळेत प्रवेश दिला. हे विद्यार्थी अधिकृत शाळेत न गेल्याने बेलगाव येथील पालक पांडुरंग पिराजी पोकळे व भूतवाडा (ता.जामखेड) येथील छायाबाई नवनाथ केकाण यांनी तनपुरे विरोधात पाटोदा न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने चार मूकबधीर विद्यार्थ्यांना पालकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, संस्था सचिव विठ्ठल तांबे यांनीही पाटोदा पोलिसांत तक्रार दिली. बेकायदा शाळा भरविणाऱ्या १५ कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली. दरम्यान, या संस्थेतील सदस्यांमध्ये असलेल्या मतभेदामुळे मूकबधिर विद्यार्थ्यांची नाहक परवड होत आहे.पालक गेले न्यायालयातअनधिकृत शाळा केल्याप्रकरणी समाज कल्याण अधिकारी व पोलिसांना कळविले असल्याचे सचिव विठ्ठल तांबे यांनी सांगितलेन्यायालयाच्या आदेशाने चार मुलांचा ताबा पालकांकडे