शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो हार मानू नका, तोडगा निघू शकतो

By admin | Updated: June 17, 2014 01:10 IST

बीड: दरवर्षी दहावी-बारावीचा निकाल लागला की, निकाल मनासारखा नाही आला तर मुलं निराश होतात. डिप्रेशन मध्ये जातात.

बीड: दरवर्षी दहावी-बारावीचा निकाल लागला की, निकाल मनासारखा नाही आला तर मुलं निराश होतात. डिप्रेशन मध्ये जातात. मुलांची मानसिकता ओळखून त्यांना जीवनातील अडचणी, समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सक्षम बनविण्याची गरज आहे. त्यासाठी पालकांनीच विद्यार्थ्यांना सर्व समस्यांवर तोडगा काढता येतो, हार मानू नका, याची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. एकमेकांशी तुलना :विद्यार्थ्यांच्या या मानसिकतेबद्दल व पालकांच्या आग्रही वृत्तीबद्दल मानसोपचार तज्ज्ञ डॉ.एस. एच. मोगले , समुपदेशक मनीषा तोकले यांनी ‘लोकमत’शी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, विद्यार्थी टीव्हीवरील मालिका, चित्रपटातील विद्यार्थ्यांचे आदर्श जीवन पाहून त्याची स्वत:शी तुलना करतात. तसेच आपसातही एकमेकांशी तुलना करतात. अमूक विद्यार्थी हुशार आहे. त्याचे आईवडील मदत करतात, अशा स्वरूपाची तुलनाही करतात. न्यूनगंड तयार होतो:आईवडीलही मुलांना त्यांच्या बरोबरीच्या मुलांचे उदाहरण देऊन बघ त्याला कसे चांगले गुण मिळाले, वगैरे तुलना करतात. त्याचा विद्यार्थ्यांच्या मनावर विशेषत: मध्यमवर्गीय घरातील मुलांच्या मनावर विपरित परिणाम होऊन न्यूनगंड तयार होतो. त्यातच अशी मुले जर हळव्या मनाची असतील तर आत्महत्येकडे वळतात. जीवघेणी स्पर्धा :अनेकदा आपल्या शिक्षणासाठी खर्च करण्याची ऐपत आईवडिलांकडे नसल्याने ते अडचणीत आलेले पाहूनही मुलांना नैराश्य येते. त्यांना बँकेकडून शैक्षणिक कर्ज मिळू शकते. त्यामुळे आई-वडिलांवर शिक्षणाचा भार येत नाही, हे समजावून सांगितले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना तसेच पालकांनाही वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेऊनच चांगले करिअर होऊ शकते असे नाही तर इतरही अनेक क्षेत्रात भरपूर पैसे कमावण्याची संधी आहे, हे बिंबविणेही गरजेचे आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली जीवघेणी स्पर्धा कमी होऊन मुलांच्या मनावरील ताण कमी होईल. मानसिक आजारही जडतात :अनेकदा मुलांना मानसिक आजारही जडतात. मात्र आईवडील ते मान्य करायला तयार होत नाहीत. भारतात या आजारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन दूषित आहे. सर्वसाधारण परिस्थितीत मुले आत्महत्येकडे वळत नाहीत. आजाराकडे दुर्लक्ष झाले तर खूपच नैराश्य येऊन ते आत्महत्येचे पाऊल उचलतात. त्यामुळे या आजारांबाबतही सामाजिक उद्बोधनाची गरज आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी मनमोकळा संवाद साधला पाहिजे. जरी मुले चुकली, तरीही त्यांना ती आपली मुले असल्याने त्यांच्यावर जिवापाड प्रेम असल्याची जाणीव पालकांनी त्यांना करून दिली पाहिजे. तसेच मुलांच्या वागणुकीत जर बदल जाणवला तर मुलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर मार्ग शोधला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण झाले तर त्यांना नैराश्य येणार नाही व आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणार नाहीत.(प्रतिनिधी)जीवघेणी स्पर्धा, पालकांच्या वाढत्या अपेक्षा व विद्यार्थ्यांच्या मर्यादा यांच्या संघर्षातून विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण होते. हे नैराश्य वाढले तर मुले आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाकडे वळतात. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता ओळखूनच अभ्यासक्रम घेऊ द्यावा. - डॉ.अनिल बारकुल,बीड