बजाजनगरात विद्यार्थ्यांनी केला परिसर स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 20:52 IST2019-02-28T20:51:51+5:302019-02-28T20:52:30+5:30

बजाजनगरातील हायटेक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बजाजनगर परिसरात स्वच्छता मोहिम राबवून परिसर स्वच्छ केला.

 Students in the Bajajnagar campus clean | बजाजनगरात विद्यार्थ्यांनी केला परिसर स्वच्छ

बजाजनगरात विद्यार्थ्यांनी केला परिसर स्वच्छ

वाळूज महानगर : बजाजनगरातील हायटेक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बजाजनगर परिसरात स्वच्छता मोहिम राबवून परिसर स्वच्छ केला.


मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून या महाविद्यालयाच्या राष्टÑीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम हाती घेतला होता. विद्यार्थ्यांनी महाराणा प्रताप चौक, शिवाजी महाराज चौक, मोहटादेवी परिसर, हायटेक महाविद्यालय परिसर आदी ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली. या प्रसंगी प्राचार्य सिद्धार्थ उंदीरवाडे, विभाग प्रमूख प्रा.आर.एस.खापर्डे, प्रा.डी.के.मिश्रा, प्रा.जी.व्ही.गुजर, प्रा.के.एस.जाधव, प्रशासकीय अधिकारी बी.बी.जाधव आदी उपस्थित होते.

Web Title:  Students in the Bajajnagar campus clean

टॅग्स :Walujवाळूज