शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
4
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
5
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
6
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
7
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
8
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
9
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
10
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
11
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
12
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
13
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
14
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
15
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
16
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
17
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
18
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
19
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
20
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी न्यायाधिकरणाचा प्रस्ताव गुलदस्त्यात!

By admin | Updated: December 6, 2014 00:19 IST

विजय सरवदे, औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेत मंजूर झालेल्या विद्यार्थी न्यायाधिकरणाच्या प्रस्तावाला सहा महिन्यांपासून मुहूर्त लागलेला नाही.

विजय सरवदे,  औरंगाबादडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेत मंजूर झालेल्या विद्यार्थी न्यायाधिकरणाच्या प्रस्तावाला सहा महिन्यांपासून मुहूर्त लागलेला नाही. काही शिक्षण सम्राटांच्या दबावाखाली येऊन विद्यापीठ प्रशासनाने या प्रस्तावाला खीळ घातली असावी, अशी चर्चा सध्या विद्यापीठ वर्तुळात ऐकायला येत आहे.मुंबई विद्यापीठ अधिनियमात तरतूद असलेले हे न्यायाधिकरण महाराष्ट्रात अथवा देशातील एकाही विद्यापीठात आजपर्यंत स्थापन झालेले नाही. प्रामुख्याने मराठवाड्यासारख्या मागास परिसरातील विद्यार्थ्यांची स्थिती गरीब व मध्यमवर्गीय आहे. या विद्यार्थ्यांना न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणे परवडणारे नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी संस्थाचालक, विद्यापीठ किंवा शासनाच्या जाचक अटींचे बळी ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेत पारित झालेला ‘विद्यार्थी न्यायाधिकरण’ स्थापन करण्याचा ठराव हा ऐतिहासिक मानला जातो. विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रामध्ये १६ आॅगस्ट रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. त्या बैठकीत व्यवस्थापन परिषदेचे राज्यपालनियुक्त प्रतिनिधी उल्हास उढाण यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या व गाऱ्हाणी मांडण्यासाठी विद्यापीठात एक ‘विद्यार्थी न्यायाधिकरण’ स्थापन करावे, असा ऐतिहासिक ठराव मांडला. तो एकमताने मंजूर झाला. त्यानंतर पारित झालेल्या या ठरावावर विद्यापीठ प्रशासनाने आजपर्यंत कसलीही कार्यवाही केलेली नाही. ‘विद्यार्थी न्यायाधिकरण’ स्थापन करण्याच्या कार्यवाहीस विलंब होत असल्याबद्दल उढाण यांनी प्रशासनाकडे एका पत्राद्वारे नाराजीही व्यक्त केली. शासनाची मंजुरी मिळेपर्यंत विद्यापीठाने स्वत:च्या फंडातून नियुक्त केल्या जाणाऱ्या न्यायाधिकरण सदस्याला वेतन अदा करण्याची सूचना उढाण यांनी प्रशासनाला केली आहे. दुसरीकडे या प्रस्तावाबाबत कुलगुरू अनुकूल असले तरी विद्यापीठ प्रशासनावर काही शिक्षण सम्राटांचा दबाव येत असल्यामुळे हा प्रस्ताव गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात ऐकायला मिळत आहे.