शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अडीच दशकांचा जगण्यासाठीचा संघर्ष

By admin | Updated: August 18, 2014 00:34 IST

गंगाधर तोगरे, कंधार गऊळ येथे १९८८ पासून अंशकालीन स्वच्छक म्हणून नियुक्ती झाली. अवघ्या ८० रुपये मानधनावर सेवा करण्यास प्रारंभ झाला.

गंगाधर तोगरे,  कंधारगऊळ येथे १९८८ पासून अंशकालीन स्वच्छक म्हणून नियुक्ती झाली. अवघ्या ८० रुपये मानधनावर सेवा करण्यास प्रारंभ झाला. वाढत्या महागाईत सुद्धा आता १८०० रुपये तुटपुंज्या मानधनावर नामदेव भंडारे सेवा पुरवितात. अडीच दशकांपासून जगण्यासाठीचा संघर्ष चालू आहे. सेवेत कायम करुन अल्प मानधनात रुतलेला संसार बाहेर काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी न्याय द्यावा, अशी आर्तहाक दिल्याचे समोर आले आहे. राज्यातील एकमेव लालकंधारी गोवसंवर्धन केंद्राचे गऊळ येथे १९८८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांनी उद्घाटन केले. लालकंधारी पशुधन इतर जातीच्या पशुधनापेक्षा वेगळे असल्याचे मान्यता मिळविण्यासाठी, या भागातील शेतकऱ्यांना शेतीचा जोडधंदा तेजीत आणण्यासाठी भाई केशवराव धोंडगे यांनी मोठे प्रयत्न केले. गोसंवर्धन केंद्रामुळे लालकंधारी पशुधनाची वाढ व विकास व्हावा, दुग्धक्रांतीला चालना मिळेल, यासाठी प्रयत्न झाले. त्याला अद्याप मुर्तरुप आले नाही. परंतु केंद्रात अंशकालीन स्वच्छकपदावर १९८८ पासून फक्त ८ रुपये मानधनावर नामदेव भंडारे यांनी भविष्यात मोठा फायदा होईल या आशेने कामास प्रारंभ केला.अल्प मानधनामुळे संसाराचा गाडा हाकने कठीण झाले आहे. यामुळे वरिष्ठांकडे अर्ज-विनंत्या करण्यात आल्या. यामुळे १४० रुपये मानधन सुरु झाले. आता १८०० रुपये आहे. अन्नधान्य, भाजीपाला, खाद्यतेल, शिक्षण आदींचा खर्च हा आवाक्याबाहेर झाला आहे. टिचभर पोटाची खळगी भरावी की शिक्षणाचा खर्च करावा, अशा विचित्र कात्रीत कुटुंबाची फरफट सुरु झाली आहे. त्यामुळे परिचर पदावर कायम करण्यासाठी विनंती अर्ज सुरु झाले. परंतु याकडे अद्याप वरिष्ठ पातळीवरुन विशेष लक्ष दिले ानही. सेवेत कायम असणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्यांना वेतन आयोग, वार्षिक वेतनवाढ, नोकरीतील सर्व फायदे मिळतात. त्यामुळे आपल्या मुलाला डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनिअर, जिल्हाधिकारी करण्यासाठी धडपडत असतात. उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील असतात. याउलट अल्प मानधनावर कोणते स्वप्न उरी बाळगावे, असा प्रश्न त्यांना पडतो. परिचर पदावर कायम करण्यात आले असते तर इतर कर्मचाऱ्याप्रमाणे शासकीय सोयी-सुविधा मिळाल्या असत्या. परंतु घोडे नेमके कुठे अडले हा प्रश्न आहे.