शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी आजपासून संपावर

By admin | Updated: June 2, 2014 01:10 IST

परभणी : पाणीपुरवठा विभागातील कामगारांचे थकित वेतन व अन्य मागण्यांसाठी कर्मचारी २ जूनपासून बेमुदत संपावर जाणार होते.

परभणी : पाणीपुरवठा विभागातील कामगारांचे थकित वेतन व अन्य मागण्यांसाठी कर्मचारी २ जूनपासून बेमुदत संपावर जाणार होते. त्या संदर्भात मनपा आयुक्त यांनी कर्मचार्‍यांची बैठक बोलावून संप मागे घेण्यासाठी चर्चा केली. मात्र चर्चा फिस्कटल्याने २ जूनपासून पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. यामुळे कामकाजावर परिणाम होणार आहे. परभणी शहर महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यांना २९ मे रोजी एक महिन्याचा पगार देण्यात आला आहे. पालिकेचे उत्पन्न अत्यंत तोकडे आहे. एलबीटी वसुली कमी आहे. महापालिकेचे उत्पन्न व अस्थापनेचा खर्च पाहता पालिकेतील कर्मचार्‍यांच्या पगारी वेळेत करणे अशक्य झाल्यामुळे वसुलीत मालमत्ता कर, पाणीपट्टी व पालिकेच्या गाळ्यापासून उत्पन्न वाढविण्याचा प्रशासनाने प्रयत्न करीत आहे. परंतु, म्हणावे तसे यश मिळत नसल्याने मनपा पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यांचे मागील सहा महिन्यांचा पगार झाला नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांनी कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली २ जूनपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा मनपा आयुक्त यांना दिला होता. त्या अनुषंगाने मनपा आयुक्त अभय महाजन, उपायुक्त दीपक पुजारी, पाणीपुरवठा अधिकारी किशोर संद्रे, लालबावटाचे कॉ. राजन क्षीरसागर यांच्यासह मनपा कर्मचार्‍यांची बैठक १ जून रोजी घेण्यात आली. मनपा आयुक्त अभय महाजन म्हणाले, शासनाकडून थकित अनुदान वर्ग होताच कर्मचार्‍यांचे वेतन तत्काळ करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र कर्मचार्‍यांनी आपल्या मागण्या रेटून धरल्या. त्यामुळे चर्चा फिस्कटली. २ जूनपासून मनपा पाणीपुरवठा कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन करणार आहेत. यामुळे नागरिकांना गैैरसोयीस सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)मनपा संघटनेसोबत मनपा आयुक्त अभय महाजन यांनी सकारात्मक भूमिका घेऊन मागण्या सोडविण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागेल, असे सांगितले. परंतु, मनपा कर्मचार्‍यांनी टोकाची भूमिका घेत संप पुकारला आहे. त्यामुळे संघटनेने नागरिकास वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालिकेच्या वतीने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त अभय महाजन यांनी केले आहे.सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. तसे नागरिकांना पाण्याची आवश्यकता वाढली आहे. त्यातच कर्मचारी बेमुदत आंदोलन करणार आहेत. त्यामुळे परभणीकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. मनपाकडून अगोदर १०-१२ दिवसांना पाणी मिळत आहे. त्यातच पाणीपुरठवा विभागातील कर्मचारी संपावर गेल्यास पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.