शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिराढोणमध्ये डिजिटलवरून तणाव

By admin | Updated: July 30, 2014 00:54 IST

शिराढोण : चौकात लावलेले डिजिटल काढल्याने नागरिकांना चिथावणी देत पोलिस ठाण्यात आलेल्या ५२ जणाविरूध्द शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

शिराढोण : चौकात लावलेले डिजिटल काढल्याने नागरिकांना चिथावणी देत पोलिस ठाण्यात आलेल्या ५२ जणाविरूध्द शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना मंगळवारी दुपारी शिराढोण (ताक़ळंब) येथे घडली असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे़पोलिसांनी सांगितले की, शिराढोण येथील एजाज उर्फ काका डांगे, बशीर डांगे, वाजीद डांगे, बबलू शेख, नजीम पठाण, बशीर शेख, समीर पठाण, दाऊद पठाण, कलीम दखणी, डांगे, किझर फारूखी, मुद्दू पटेल व इतर ३० ते ४० जणांनी मंगळवारी दुपारी संभाजी चौकात जमाव गोळा केला़ तेथे लावलेले डिजिटल का काढले असे म्हणत गोंधळ घालून इतरांना चिथावणी देत सोबत घेऊन पोलिस ठाणे गाठले़ आक्षेपार्ह व बाधक डिजिटल लावत दोन समाजात तेढ निर्माण करीत लोकांना चिथावणी देऊन जमावबंदीचा आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पो.ना. सुधीर तुगावकर यांनी शिराढोण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली़ या फिर्यादीवरून वरील ५२ जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास बीट अंमलदार जाधव हे करीत आहेत़ दरम्यान, गावात तणावपूर्ण शांतता असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी उपाययोजना केल्याचे पोलिसांनी सांगितले़ (वार्ताहर)गोविंदपुरात महिलेचा विनयभंगशिराढोण : महिलेचा विनयभंग करणाऱ्याविरूध्द शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना गोविंदपूर (ताक़ळंब) येथे मंगळवारी घडली़ याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गोविंदपूर येथील एक महिला मंगळवारी पाणी भरत असताना गावातील बाळू उर्फ बाळासाहेब मुंडे याने तिच्या हाताला धरून विनयभंग केला़ महिलेने आरडाओरड करताच तिस शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली़ या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बाळासाहेब मुंडे याच्याविरूध्द शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोना अण्णा कदम, बाबूराव चव्हाण हे करीत आहेत़उमरगा येथे भावंडांना मारहाणउस्मानाबाद : दारू पिण्यासाठी पैसे मागण्याच्या कारणावरून भावंडांना मारहाण करणाऱ्याविरूध्द उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास उमरगा येथील एमएसईबी झोपडपट्टीजवळ घडली़पोलिसांनी सांगितले की, उमरगा येथील एमएसईबी झोपडपट्टी येथील मुस्तफा कादरसाब नदाफ (वय-२६) यांना राजू तारासिंग राठोड याने दारू पिण्यासाठी पस्ैो मागण्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत हातातील विळ्याने मारहाण करून गंभीर जखमी केले़ मुस्तफा नदाफ यांचा भाऊ सोडविण्यासाठी आला असता त्यालाही शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ मुस्तफा नदाफ यांच्या फिर्यादीवरून राठोड याच्याविरूध्द उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि हालसे हे करीत आहेत़