शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
5
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
6
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
7
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
8
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
9
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
10
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
11
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
12
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
13
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
14
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
15
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
16
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
17
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
18
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
19
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
20
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याची सांगता

By admin | Updated: May 16, 2014 00:19 IST

पोखर्णी : श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता झाली. काल्याचे कीर्तन व कुस्त्यांचे जंगी सामने चांगलेच रंगले.

 पोखर्णी : श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता झाली. काल्याचे कीर्तन व कुस्त्यांचे जंगी सामने चांगलेच रंगले. १४ मे रोजी रात्री निघालेली श्रींच्या पालखी मिरवणुकीत हनुमान मंदिराजवळ ह.भ.प. रामकिशन महाराज ठाकुरबुवा दैठणकर व काका महाराज तेरकर यांचे कीर्तन झाले. यानंतर पालखी चावडीसमोरील प्रांगणात आल्यानंतर गवळणी, भारुडे आदींनी पालखी सोहळ्यात रंगत वाढविली. श्रींच्या पालखी सोहळ्यात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. टाळ-मृदंगाचा गजर, ढोलताशे व नरहरी नामच्या गजरात पालखी मिरवणूक निघाली. पहाटे श्रींची पालखी नृसिंह मंदिरात परत आल्यानंतर सकाळी ६ वाजता ह.भ.प. वेदांतचार्य प्रल्हादशास्त्री दैठणकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनात शास्त्रींनी धार्मिक कार्यक्रमात होणार्‍या काल्याचे महत्त्व विषद केले. सायंकाळी ६ वाजता कुस्त्यांच्या दंगली सुरू झाल्या. जिल्ह्यासह बाहेरील मल्ल कुस्त्यांसाठी पोखर्णीत दाखल झाले होते. महिलांच्या कुस्त्याही झाल्या. रात्री उशिरापर्यंत कुस्त्या सुरुच होत्या. ग्रामस्थ संयोजनामध्ये हिरिरीने सहभागी झाले होते. छोट्या-मोठ्या कुस्त्यांसह हजारो रुपयांपर्यंत पारितोषिके देण्यात आली. नृृसिंह जन्मोत्सव सोहळ्यासाठी नृसिंह संस्थान व सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)