शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने ८७८ खांब जमीनदोस्त

By admin | Updated: June 6, 2014 01:03 IST

बीड: बुधवारी जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास सुटलेल्या जोरदार वार्‍याने महावितरणचे मोठे नुकसान झाले. आष्टी तालुक्याला याचा सर्वाधिक फटका बसला. जिल्ह्यात एकूण ८७८ विद्युत खांब आडवे झाले.

बीड: बुधवारी जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास सुटलेल्या जोरदार वार्‍याने महावितरणचे मोठे नुकसान झाले. आष्टी तालुक्याला याचा सर्वाधिक फटका बसला. जिल्ह्यात एकूण ८७८ विद्युत खांब आडवे झाले. ३३ के.व्ही. उपकेंद्रात विद्युत वाहिनीचे १०८, ११ के.व्ही.चे १८१ तर लघुदाबाचे ५८९ खांब जमीनदोस्त झाले. या शिवाय दोन रोहीत्रही कोसळले. अंबाजोगाई येथील केंद्रीय पॉवर ग्रीड उपकेंद्रातून पुण्याकडे जाणार्‍या ४०० के.व्ही. अतिउच्च वाहिनीचे मनोरे आष्टी तालुक्यात कोसळले. त्यामुळे बुधवारी रात्री आष्टी तालुका अंधारात होता. दुरूस्तीचे काम मोठ्या वेगाने सुरू आहे. गुरुवारी आष्टी शहरातील एका उपकेंद्राची वाहिनी दुरूस्त झाली. मात्र अद्यापही ११ के.व्ही. वाहिन्या बंद आहेत. लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता बी.बी. पाटील, बीडचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे हे सर्वपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दुरूस्ती काम वेगाने पूर्ण करण्यावर भर असून दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी दिली. सहकार्याचे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)अंबाजोगाईत वीज पडून युवक ठार येथील काळवटी तांडा परिसरात वीज पडून एक तरूण ठार झाला़ ही दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घडली़ कमलाकर किसन घोलप (वय २८ रा़ काळवटी तांडा, अंबाजोगाई) असे मयताचे नाव आहे़ ते बुधवारी सायंकाळी काळवटी तांडा परिसरात फिरण्यासाठी गेला होता. बुधवारी सायंकाळी ६.५५ च्या सुमारास पाऊस व विजांचा कडकडाट सुरू झाल्यामुळे कमलाकर व त्याचा मित्र आंब्याच्या झाडाखाली थांबले. त्यानंतर आकाशात कडाडणारी वीज थेट झाडावर कोसळली. या दुर्घटनेत तो गंभीर भाजल्याने स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ उपचार सुरू असताना बुधवारी रात्री त्याचे निधन झाले. याप्रकरणी रंगनाथ घोलप यांच्या खबरीवरून शहर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे़