शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
4
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
7
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
8
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
9
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
10
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
11
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
12
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
13
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
14
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
15
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
16
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
17
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
18
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
19
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
20
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा रास्ता रोको, बंद

By admin | Updated: August 1, 2014 00:25 IST

रेणापूर/चाकूर : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी गुरुवारी रेणापुरात धनगर समाजाच्या वतीने बंद पाळण्यात

रेणापूर/चाकूर : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी गुरुवारी रेणापुरात धनगर समाजाच्या वतीने बंद पाळण्यात येऊन तहसीलवर मोर्चा काढण्यात आला़ त्याचबरोबर चाकुरात जुन्या बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर ही जात असल्याचे स्पष्ट आहे़ १९७६ ला राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या उपसचिवांनी धनगड जातीचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, अशी शिफारस केली़ विशेष म्हणजे १ मे १९६० च्या महाराष्ट्र स्थापनेनंतर अनुसूचित जमातीच्या यादीत धनगड असा उल्लेख आहे़ महाराष्ट्रात धनगड ही जमात कोठेही नसल्याने धनगड म्हणजे धनगर असल्याचे स्पष्ट होते़ त्यामुळे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा़ या मागणीसाठी गुरुवारी रेणापूर येथे शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते़ रेणापुरातील रेणुकादेवी मंदिरापासून सकाळी मोर्चा काढण्यात आला़ हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ यावेळी अ‍ॅड़ अण्णाराव पाटील, अनिरूद्ध येचाळे, गोविंद करडे, के़आऱवाघमोडे, दत्ता सरवदे, सतीश हाके, रामराव माने, मनोहर व्यवहारे, नाना कसपटे, दिलीप गोरके, दिलीप राजे, गोरे, गोपीनाथ हजारे, मुकेश राजे, कैलास होळकर, गहिनीनाथ लोहकरे, अश्रुबा चोरमले, हणमंत शेंडगे आदी सहभागी झाले होते़ दरम्यान, गावातील बाजारपेठ सायंकाळपर्यंत बंद होती़ त्यामुळे गावातील व्यवहार संपूर्णपणे ठप्प झाले होते़(वार्ताहर)वाहतूक काही काळ ठप्प़़़चाकूर येथील जुन्या बसस्थानकासमोर धनगर समाजाच्या वतीने गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनात अ‍ॅड़ माधवराव कोळगावे, गंगाधर केराळे, दयानंद सुरवसे, सुरेश हाके, मिलिंद महालिंगे, माधव गाडेकर, शिवाजी खांडेकर, बालाजी देवकत्ते, नारायण राजुरे, बाबाराव पाटील, अजित खंदारे, अशोक करडीले, विवेकानंद लवटे, पवन सूर्यवंशी सहभागी झाले होते़