शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
8
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
9
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
10
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
11
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
12
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
13
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
14
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
15
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
16
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
18
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
19
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
20
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

'गळती थांबवा, ऑक्सिजन वाचवा'; आयसीयू सांभाळणाऱ्या तज्ज्ञांचा सल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 19:35 IST

oxygen for corona patients शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९५पेक्षा अधिक असायला हवी. ही पातळी घरच्या घरी पल्स ऑक्सिमीटर या छोट्या यंत्रास बोटाला लावून तपासू शकतो.

ठळक मुद्दे९४च्या खाली पातळी आढळली, तर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. कोविडमध्ये कधी कधी इतर लक्षणे नसताना फक्त ऑक्सिजनची पातळी कमी होते

औरंगाबाद : कोरोनाच्या रौद्ररूपाने ऑक्सिजनची मागणी अनेक पटीने वाढली आहे. पण सध्याच्या निकडीमुळे ऑक्सिजनच व्यवस्थाच ऑक्सिजनवर आहे. ऑक्सिजन तयार करण्याची कारखाने तयार होतील. रेल्वेने ऑक्सिजन येईल. पण या प्राणवायूला प्राणापलीकडे जपण्याचे आणि जपून वापरण्याचे क्षण आहे. एकीकडे कमीत कमी, योग्य रुग्णालाच वापरणे, तर दुसरीकडे गळती थांबविणे, हे महत्त्वाचे उपाय आहे, असे म्हणत यासंदर्भात आयसीयू सांभाळणारे शहरातील तज्ज्ञांनी विविध सूचना केल्या आहेत.

शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९५पेक्षा अधिक असायला हवी. ही पातळी घरच्या घरी पल्स ऑक्सिमीटर या छोट्या यंत्रास बोटाला लावून तपासू शकतो. याची किमती ५०० ते एक हजार रुपये असते. सध्याच्या काळात दिवसातून २ ते ३ वेळेस त्याद्वारे तपासणी केली पाहिजे आणि ९४च्या खाली पातळी आढळली, तर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. वृद्धांनी तीन मिनिटे आणि इतरांनी सहा मिनिटे घरातल्या घरात चालून सुद्धा ऑक्सिजनची पातळी कमी होते का, हे बघायला हवे. ९४च्या खाली पातळी गेली तर लगेच सावध व्हायला हवे. कारण कोविडमध्ये कधी कधी इतर लक्षणे नसताना फक्त ऑक्सिजनची पातळी कमी होते, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

 डाॅ. अजित भागवत, हृदयरोगतज्ज्ञ :- ऑक्सिजन काटकसरीने, योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात, योग्य रुग्णांसाठी वापरावे, हे मी नेहमीच मानत आलो आहे. पण ऑक्सिजनची इतकी टंचाई भासेल, अशी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. आहे त्या परिस्थितीचा सामना तर करायला हवा.१. इतर गंभीर गुंतागुंत नसेल तर कोविडच्या रुग्णास ९४च्या खाली पातळी गेल्याशिवाय ऑक्सिजन देऊ नये. अर्थात त्याच्याकडे सतत लक्ष ठेवावे. कारण ९४ असलेली पातळी २ तासांनी ९० वर सुद्धा गेलेली असू शकते.२. नाकात नळी लावून ऑक्सिजन देण्यापेक्षा मास्कने देणे बरे. कारण मास्क सहजासहजी काढून टाकत नाही. नळी बऱ्याचदा घसरून जाते किंवा रुग्ण झटकून काढून टाकतो. अशाने रुग्णाचे नुकसान तर होतेच, ऑक्सिजन सुद्धा वाया जातो.३. जेवताना, पाणी पिताना, बोलताना रुग्ण मास्क काढून ठेवतात. पण ऑक्सिजनचा पुरवठा मात्र सुरूच राहतो.४. जिथे अत्यावश्यक असते, तिथेच हायफ्लोने ऑक्सिजनचा वापर करावा.

डाॅ. श्रीकांत सहस्त्रबुद्धे, इंटेन्सिव्हिस्ट : १. कमीत कमी प्रमाणात ऑक्सिजनचा वापर करण्याचा प्रयत्न करावा.२. एनआयव्ही (नाॅन इनव्हेसिव व्हेंटिलेटर) वर रुग्ण असेल तर त्याची पातळी ९२-९३ पर्यंत न्या. १०० वर नेण्याचा प्रयत्न करू नका. अशाने ऑक्सिजनचे प्रमाण खूप जास्त होते.३. इनव्हेसिव व्हेंटिलेटरवर असताना ऑक्सिजनची पातळी ८५पर्यंत असली तरी ठीक आहे.४. एक ते दोन लिटर प्रति मिनिटपासून सुरुवात करून गरजेप्रमाणे ऑक्सिजनचा रुग्णाला पुरवठा वाढवावा, अथवा घटवावा. तीव्र आजारात ५ ते १० लिटर प्रतिमिनिटप्रमाणे ऑक्सिजन सुरू करून गरजेनुसार वाढवावा. स्थिर झाल्यावर थोडे कमी करून बघावे.

डाॅ. धनंजय खटावकर, अतिविशेषोपचार तज्ज्ञ :१. ऑक्सिजन पुरवठा करणारे पाइप व त्यांना जोडणारे भाग नियमितपणे तपासावे. कुठे गळती किंवा अडथळा नाही, हे बघावे. हे सर्व चांगल्या प्रतिचे असायला हवे.२. जर ऑक्सिजन तात्पुरता थांबवता येऊ शकत नसेल तर रुग्ण खातो-पितो तेव्हा मास्कच्या ठिकाणी नाकातील नळ्या लावल्यास उपयुक्त ठरते. शिवाय जेवताना मास्क काढून ठेवून पुरवठा सुरू राहिल्यास २० ते ३० मिनिटे, दिवसातून २ ते ३ वेळेस प्रत्येक रुग्णाचा ऑक्सिजन पुरवठा वाया जाऊ शकतो.३. रुग्णाच्या नातेवाइकांना गांभीर्य दाखविण्यासाठी ऑक्सिजनचा वापर करणे अक्षम्य आहे.४. सध्या खूप ऑक्सिजनची आवश्यकता आहे. अशावेळी लिक्विड टँकची टाकी किंवा सिलिंडर अर्धवट भरलेले असल्यास हे गैरकृत्य लक्षात येणार नाही.५.ऑक्सिजनचा वापर करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना ऑक्सिजन योग्य प्रकारे वापरण्यासंदर्भात प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

डाॅ. अमोल जोशी, नवजात शिशू तज्ज्ञ, तसेच प्राणवायू समिती कार्यकारी प्रमुख, घाटी : 

१. जमेल तितके ऑक्सिजन काॅन्सट्रेटर’ या यंत्राचा वापर केल्यास सिलिंडर किंवा टाकीतून पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजनवर ताण पडणार नाही. हे यंत्र हवेतील ऑक्सिजन जमा करते.२. हाय फ्लो नेसल ऑक्सिजन (एचएफएनओ) या तंत्रज्ञानापेक्षा नाॅन इनव्हेसिव व्हेंटिलेटर वापरल्यास बचत होते.३. अर्थात सर्व स्तरावर पुरवठादारांपासून रुग्णापर्यंत ऑक्सिजनची गळती आणि अपहार थांबवायला हवा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर