रोक सको तो रोको; पोलिसांची गाडी पळविणाऱ्या चोरट्याने पुन्हा दोन गाड्या चोरल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 18:12 IST2022-03-29T18:11:34+5:302022-03-29T18:12:27+5:30

पोलीस त्याच्या मागावर असून अद्याप तो पोलीसांच्या हाती लागला नाही.

Stop if you can; The thief who stole the police vehicle again stole two vehicles | रोक सको तो रोको; पोलिसांची गाडी पळविणाऱ्या चोरट्याने पुन्हा दोन गाड्या चोरल्या

रोक सको तो रोको; पोलिसांची गाडी पळविणाऱ्या चोरट्याने पुन्हा दोन गाड्या चोरल्या

खुलताबाद: खुलताबाद पोलीस ठाण्याचे सरकारी जीप चोरून नेऊन ती शेतात सोडल्यानंतर त्या चोरट्याने मध्यरात्री पुन्हा एक दुचाकी व एक छोटा हत्ती घेवून फरार झाला आहे. पोलीस ठाण्यातून पोलीसांचे सरकारी चोरी करून एक प्रकारे त्या चोरट्याने पोलीसांच्या अब्रूचे चांगलेच धिंडवडे काढले. 

खुलताबाद पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षकाची सरकारी जीप सोमवारी रात्री साडेआठ वाजता विरमगाव येथील संदीप वाकळे याने चोरली. त्यानंतर खुलताबाद- फुलंब्री रस्त्याने  विरमगाव येथे जावून गावात सायरन वाजवित फिरला. पोलीसांनी त्याचा पाठलाग करताच त्याने एका शेतात पोलीस ठाण्याची जीप सोडून फरार झाला. मात्र मध्यरात्री गदाणा येथून एक दुचाकी चोरून भडजी येथे आला तेथे दुचाकी सोडून भडजी येथील टाटा मँजिक (छोटा हत्ती) घेवून फरार झाला आहे. पोलीस त्याच्या मागावर असून अद्याप तो पोलीसांच्या हाती लागला नाही.

वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात 
खुलताबाद पोलीसांची टाटा सुमो जीप चोरी करून पोलीसांच्या अब्रूचे चांगलेच धिंडवडे निघाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी, कर्मचारी खुलताबाद पोलीस ठाण्यात बसून होते. तसेच  पथक आरोपीच्या शोधात पाठविण्यात आले आहे. 

Web Title: Stop if you can; The thief who stole the police vehicle again stole two vehicles