शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

..तर बससेवा बंद करणार!

By admin | Updated: August 17, 2014 00:17 IST

जाफराबाद : जाफराबाद, भोकरदन तालुक्यात प्रमुख मार्गावर जाफराबाद आगाराच्या बसेस सोडताना रस्ते नादुरुस्त असल्याच्या कारणामुळे बस आगाराचे

जाफराबाद : जाफराबाद, भोकरदन तालुक्यात प्रमुख मार्गावर जाफराबाद आगाराच्या बसेस सोडताना रस्ते नादुरुस्त असल्याच्या कारणामुळे बस आगाराचे आर्थिक नुकसानीबरेबरच वेळेत प्रवासी सेवा देण्यास अडचणी येत आहेत. या रस्त्यांची आणि धोकादायक पुलांची दुरुस्ती करावी, नसता बस आगार बसेस बंद करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे पत्र आगारप्रमुख एस. जी. मेहेत्रे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जाफराबाद व भोकरदनच्या उपविभागांना दिले आहे.जाफराबाद तालुक्यातील चिखली-जाफराबाद राज्य महामार्ग, भारज, आढा, वरुड वळण रस्ता व पूल धोकादायक बनला आहे. शिवाजी चौक जाफराबाद पूर्णा नदी पात्रापर्यंत रस्त्याची अवस्था पाहून शहराचे नाक दाबले आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा ते लिहा, भोकरदन, तडेगाव, माहोरा, पिंपळगाव कड, बोरगाव, हिवराबळी, जाफराबाद हा रस्ता दयनीय अवस्थेत असून रस्त्याचे साईड पट्टे, मध्यभागी मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता धोदायक बनला आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस प्रवासी वाहतूक करीत असताना आपला जीव धोक्यात ठेवून प्रवासी सेवा देतात. परंतु यामुळे आगाराला बसेसच्या स्प्रिंग तुटणे, टायर फुटणे, पाटे तुटणे यांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी बस सेवा वेळेत पोहचत नसल्याने विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बस आगाराने सहाय्यक उपअभियंता यांना १८ व २१ जुलै रोजी दोन वेळेस पत्र व्यवहार केला आहे. माहोरा, पिंपळगाव रस्त्याचे डांबरीकरनाचे काम निकृष्ट झाले असून रस्त्याच्या दोन्ही बाजू मुरुमाने न भरता मातीत भरुन दोन-दोन फुयाचे खड्डे तयार झाले आहेत. पिंपळगाव, भोरखेडा, वरुड येथून ६५ मुली शाळेत ये-जा करतात. अशा परिस्थितीत बस बंद झाल्यास यांची जबाबदारी महामंडळ घेणार नाही, असे दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.लोकप्रतिनिधी यांनी उद्घाटने व लोकार्पण सोहळ्यांची स्पर्धा लावली आहे. कोटीने विकास निधी खेचून आणून उद्याचे भविष्य म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहत आहोत, त्यांचे कंबरडे तर या निमित्ताने आधिच मोडीस निघाले आहे. याचा विचार करण्याची वेळ पालक, विद्यार्थी यांची आहे. (वार्ताहर)