शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

छेडछाडीचा महिला, मुलींना उपद्रव

By admin | Updated: June 17, 2014 01:11 IST

कडा: आष्टी, कडा येथे महिला, मुलींची छेडछाड होण्याचे प्रकार वाढले आहेत. मुलींची घडला प्रकार घरच्यांना सांगण्यात कुचंबना होते.

कडा: आष्टी, कडा येथे महिला, मुलींची छेडछाड होण्याचे प्रकार वाढले आहेत. मुलींची घडला प्रकार घरच्यांना सांगण्यात कुचंबना होते. तर महिलाही नको ते झंजट म्हणून पोलीस ठाण्याची पायरी चढण्यास कचरतात. परिणामी येथे रोडरोमिओंचा उपद्रव वाढला आहे. आष्टी व कडा ही आष्टी तालुक्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र आहेत. ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची हवी त्या प्रमाणात सुविधा नसल्याने मुली कडा व आष्टी येथे शिक्षणासाठी येतात. ग्रामीण भागातील काही मुली आपल्या गावाहून अप- डाऊन करतात तर काही मुली आष्टी, कडा शहरात किरायाने रूम करून राहतात. मुली ज्यावेळी शिकवणी वर्ग, महाविद्यालयात जातात त्यावेळी महाविद्यालयाच्या परिसरासह चौकाचौकात थांबलेले सडकसख्याहरी त्यांची छेड काढतात. आष्टी व कडा येथे अनेक छेडछाडीचे प्रकार घडलेले आहेत. अनेकदा रोडरोमिओ दुचाकीवरून शहरात फिरतात. मुली पाहून जोरजोरात हॉर्न वाजविणे, मुलींची ओढणी ओढणे तसेच मुलींना पाहून गाणे म्हणणे, अश्लिल बोलणे असे प्रकारही येते सर्रास घडत आहेत. असा प्रकार ज्या मुलींबाबत घडला त्या मुलीही घडलेला प्रसंग घरच्यांना सांगण्यास टाळाटाळ करतात. यामुळे रोडरोमिओंचे अधिकच फावत असल्याचे दिसून येत आहे. छेङछाडीचे प्रकार झाल्यावर मुली पोलीस ठाण्यात येत नाहीत. यासाठी कडा येथे सहा ठिकाणी व आष्टी येथे आठ ठिकाणी तक्रार निवारण पेट्या बसविण्यात आल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे या पेट्या तब्बल दीड वर्षांपासून धूळ खात पडल्या आहेत. या पेट्यांमध्ये मुलींनी तक्रार टाकल्यास त्याकडे पाहिलेही जात नाही. या पेट्या महिनोनमहिने उघडल्या जात नसल्याने मुलींनीही तक्रार करण्याचे सोडून दिले आहे. यामुळे शाळा, महाविद्यालये व शिकवणीच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढावा, महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावा व तक्रार पेट्या पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या दैवशाला शिराळे, संगीता गर्जे यांनी केली आहे.आष्टी व कडा येथे मुलींसह महिलांनाही छेडछाडीच्या प्रकाराला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. आष्टी, कडा येथील बसस्थानकात महिला प्रवाशांची गर्दी असते. तसेच महिला अनेकदा चारचौघी मिळून बाजारामध्येही येतात. अशा वेळी रोडरोमिओ त्यांची छेड काढण्याच्या घटना घडत आहेत. महिलांना पाहून सडकसख्याहरी बसस्थानकात मोबाईलवरून मोठमोठ्या आवाजात गाणे लावतात. यामुळे महिलांची कुचंबना होत आहे. असे प्रकार रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी सारीका खंडागळे यांच्यासह महिलांनी केली आहे.येथे होणाऱ्या छेडछाडीच्या प्रकारासंदर्भात आष्टी ठाण्याचे पो.नि. शशिकांत डोके म्हणाले की, पोलीसांची गस्त वाढवू, तक्रार आल्यास कारवाई करू.(वार्ताहर)चिडीमार पथकाचीही नियुक्ती नाहीशिकवणी वर्ग, महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थीनी, बसस्थानकात महिला प्रवाशांची होत आहे छेडछाड.तक्रार निवारण पेट्या बंद असल्याने मुलींपुढे निर्माण होतात प्रश्न.रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची होत आहे मागणी.