शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
5
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
6
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
7
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
8
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
9
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
10
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
11
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
12
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
13
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
14
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
15
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
16
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
17
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
18
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
19
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
20
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
Daily Top 2Weekly Top 5

सोयगावात भरदिवसा दोन ठिकाणी चोऱ्या

By admin | Updated: July 26, 2014 01:10 IST

सोयगाव : शहरात शुक्रवारी दयाळनगर व आमराई (शिवाजीनगर) भागात दिवसाढवळ्या दोन ठिकाणी घराचे कुलूप तोडून चोऱ्या झाल्या.

सोयगाव : शहरात शुक्रवारी दयाळनगर व आमराई (शिवाजीनगर) भागात दिवसाढवळ्या दोन ठिकाणी घराचे कुलूप तोडून चोऱ्या झाल्या. यात दोन लाख १५ हजारांचा ऐवज चोरी झाला आहे. भरदुपारी घडलेल्या घटनांमुळे सोयगावसह परिसरात खळबळ उडाली आहे. सोयगाव येथील दयाळनगर भागातील प्रकाश नथ्थू राऊत हे आपल्या कुटुंबासह शेतात गेलेले असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सहा हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा पंधरा हजाराचा ऐवज लंपास केला, तर दुसऱ्या एका घटनेत आमराई (शिवाजीनगर) भागात रामदास पवार यांच्या घराचे कुलूप तोडून पंधरा रुपये रोख व गोदरेज कपाटात ठेवलेले चाळीस ग्रॅम सोने व चाळीस भार चांदी असा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला.या प्रकरणी प्रकाश राऊत व रामदास पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी चोरांचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना केलेली आहेत. शहर परिसरातील संशयित भागात पोलिसांची झाडाझडती सुरू झाली आहे. गस्त वाढविण्यात आलेली आहे. पो. नि. संतोष घाटेकर, दिलीप पवार, संतोष जिथोले, मनोज कुलकर्णी, सिद्धार्थ कांबळे, ए. एम. माळी, श्रीमती भांबळ, कुलते, सीताराम धनवट आदी पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, दुपारी बारा ते तीन या वेळे झालेल्या चोऱ्यांमुळे परिसरात खळबळ उडाली असून घराला कुलूप लावून शेतात जाणाऱ्या शेतकरी कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. (वार्ताहर)