मौजमजेसाठी मित्रांच्याच गाड्या चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:43 PM2019-05-30T23:43:26+5:302019-05-30T23:44:22+5:30

स्वत: काही कामधंदा न करता अय्याशीचे जीवन जगण्याची सवय लागल्याने मौज-मजेसाठी मित्रांच्याच दुचाकी पळवून नेणाऱ्यास सिडको पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने जेरबंद केले असून, त्याने परभणी येथे वसतिगृहात दडवून ठेवलेल्या २ लाख २५ हजार रुपये किमतीच्या मोटारसायकली काढून दिल्या आहेत.

Steal your friends' cars for fun | मौजमजेसाठी मित्रांच्याच गाड्या चोरी

मौजमजेसाठी मित्रांच्याच गाड्या चोरी

googlenewsNext
ठळक मुद्देसिडको पथकाची कारवाई : आरोपीने ६ गाड्या परभणीतून काढून दिल्या

औरंगाबाद : स्वत: काही कामधंदा न करता अय्याशीचे जीवन जगण्याची सवय लागल्याने मौज-मजेसाठी मित्रांच्याच दुचाकी पळवून नेणाऱ्यास सिडको पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने जेरबंद केले असून, त्याने परभणी येथे वसतिगृहात दडवून ठेवलेल्या २ लाख २५ हजार रुपये किमतीच्या मोटारसायकली काढून दिल्या आहेत.
धीरज अंकुश चव्हाण (रा. लातूर, ह.मु. एन-६ सिडको, सिंहगड कॉलनी), असे पोलिसांनी पकडलेल्या वाहन चोराचे नाव आहे. पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिलेली माहिती अशी की, धीरज हा स्थानिक मित्राची गाडी घेऊन जायचा आणि मास्टर चावी बनवून ती आणून देत असे, संधी मिळाली की, आठवडाभरात ती गाडी चोरून न्यायचा. ती गाडी सरळ ओळखीच्या मित्राकडे परभणी येथे घेऊन जायचा आणि मित्राला काही पैशाची मागणी करायचा. पैशाच्या बदल्यात ही गाडी ठेवून घे. पैसे आल्यावर घेऊन जाईन, असे सांगात होता. ओळखीचा असल्याने व औरंगाबादेत वास्तव्यास असल्याने मित्राच्या मदतीने गाड्या इतरांना विक्री करण्याचा सपाटा त्याने लावला होता.
सिंहगड कॉलनीत राहणारा धीरज अंकुश चव्हाण हा कामाला नाही. मग हा नवीन गाड्या आणि पैसा कसा उडवितो, असा संशय काही लोकांना आला. चोरीच्या गाड्या परभणी येथे लपवून ठेवल्या असून, तो विक्री करणार आहे, अशी खात्रीलायक माहिती खबºयाकडून पोलिसांना मिळाली. त्यावरून डी.बी. पथकाने त्यास पकडून विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन विचारले असता त्याने गाड्या चोरल्याची कबुली दिली अन् दडवून ठेवलेल्या सहा गाड्यादेखील काढून दिल्या आहेत.
चव्हाण याने अजून किती दुचाकी पळविल्या, त्यांची विल्हेवाट कुठे लावली, याचा शोध सिडको ठाण्याचे पोलीस नाईक विजयकुमार वाघ करीत आहेत.
या पथकाने केली कारवाई
ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, हलवादार नरसिंह पवार, प्रकाश डोंगरे, सुरेश भिसे, विजय भानुसे, विजयकुमार वाघ यांच्या पथकाने परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने केली.
 

Web Title: Steal your friends' cars for fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.