शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

‘एसईबीसी’च्या जात प्रमाणपत्रांसाठी अर्ज घेण्यास सुरुवात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 6:10 PM

सॉफ्टवेअर अपडेट नसल्यामुळे ‘एसईबीसी’ प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळण्यात तांत्रिक अडचणी होत्या.

औरंगाबाद : महाराष्ट्र अधिनियम क्र.६२ अन्वये मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी)  प्रवर्गाकरिता जात प्रमाणपत्र व पडताळणीची कार्यपद्धत तसेच पडताळणीच्या नमुन्यांचा अध्यादेश शासनाने जारी केला आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातील सॉफ्टवेअर अपडेट नसल्यामुळे ‘एसईबीसी’ प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळण्यात तांत्रिक अडचणी होत्या. त्या अडचणी सोमवारी दूर करण्यात आल्या असून मंगळवारपासून जात प्रमाणपत्रांसाठी अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती सेतू संचालकांनी दिली.

शासनाने दिलेल्या सूचनांनुसार जात प्रमाणपत्रांसाठी आॅनलाईन फॉर्मेट आहे, त्यामध्ये एसईबीसीच्या प्रमाणपत्रांचा डाटा अपलोड करावा लागेल.  सेतू सुविधा केंद्रात सध्या ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी या प्रवर्गांचे जात प्रमाणपत्र देण्यात येते, तर याच प्रवर्गांचे प्रमाणपत्र पडताळणी संशोधन समितीकडून केले जाते. त्यात आता ‘एसईबीसी’ची भर पडणार आहे. मराठा समाजाला सामाजिक, शैक्षणिक आरक्षण देण्याबाबत शासनाने हिवाळी अधिवेशनात निर्णय घेतला. त्यानुसार ‘एसईबीसी’ जात प्रमाणपत्र कशा पद्धतीने दिले जावेत, यासाठी अध्यादेश ७ डिसेंबर रोजी जारी केला आहे. 

मराठा समाजाच्या आरक्षणाचा अहवाल १८ नोव्हेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आला. त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने मंत्रिमंडळ उपसमिती नेमली. सदरील समितीने एसईबीसी प्रवर्गासाठी विधेयक मांडले. त्यानुसार राज्य विधान मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अधिनियम ६२ पारित करण्यात आले. या निर्णयामुळे नवीन जात प्रवर्ग घोषित करण्यात आल्याने जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने कार्यपद्धती आणि नमुने जारी केले आहेत. इतर जात प्रवर्गांसाठी जे नियम लागू होते, तेच नियम ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र मिळण्यासाठी लागू करण्यात आले आहेत. शासनाने जारी केलेल्या नमुन्यानुसार सेतू सुविधा केंद्रातील सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे एसईबीसीचे जात प्रमाणपत्र देण्यास सुरूवात होईल. 

सेतूतून रोज किती प्रमाणपत्र मिळतातसेतू सुविधा केंद्रातून दररोज १५० च्या आसपास रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले १०० ते १२०, जात प्रमाणपत्रांसाठी २५ ते ३० अर्ज येतात. राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअरसाठी ५० ते ६० अर्ज येतात. मराठा समाजाकडून ‘एसईबीसी’ प्रवर्ग जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज आले काय? अशी माहिती सेतू सुविधा केंद्रातील अधिकाऱ्यांना विचारली असता ते म्हणाले, रोज दोन ते तीन अर्जदार विचारणा करीत आहेत; शासकीय पातळीवर आॅनलाईन सॉफ्टवेअर अपडेट करण्यात आले असून मंगळवारपासून अर्ज घेण्यास सुरूवात होईल, असा दावा करण्यात आला आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद