शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचा तुटवडा भासणार

By admin | Updated: May 19, 2014 01:08 IST

शेषराव वायाळ, परतूर अवकाळी पावसाने सोयाबीनची प्रत खराब झाल्याने यंदाच्या खरीप हंगामात ‘सोयाबीन’ बियाणांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होण्याची शक्यता आहे

शेषराव वायाळ, परतूर अवकाळी पावसाने सोयाबीनची प्रत खराब झाल्याने यंदाच्या खरीप हंगामात ‘सोयाबीन’ बियाणांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान कृषी विभागही याबाबत भीती व्यक्त करीत आहे. यावर्षी ऐन सोयाबीन काढणीच्या वेळीच अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारा, वार्‍यासह हा पाऊस सतत पडत राहिल्याने काढणीस आलेले व काढून टाकलेले सोयाबीन पाण्यात भिजले. काही ठिकाणी तर काढून टाकलेले सोयाबीन सततच्या पावसाने अक्षरश: पाण्यावर तरंगत होते. यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले. बरोबरच झालेल्या सोयाबीनची प्रतही खराब झाली. विविध कंपन्यांच्या बियाणे प्लॉटचीही अशीच अवस्था झाली. तालुक्यात शेतकर्‍यांकडे २ हजार ४६० क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत. या उपलब्ध बियाणांचा दर्जा खालावल्यामुळे, उगवण शक्ती कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदरील बियाणावर बीज प्रकिया करून, उगवण शक्तीची तपासणी करूनच शेतकर्‍यांना बियाणे पेरणी करावी लागणार आहे. सोयाबीन पिकाला लागवडीपासून काढणी पर्यंत खर्च कमी लागतो. त्यामुळे इतर पिकांपेक्षा तालुक्यातील शेतकरी आता सोयाबीन पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. मागील वर्षी १२ ते १३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. या वर्षी पुन्हा हे क्षेत्र वाढून १५ ते १६ हेक्टर पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र आता या वाढत्या क्षेत्राला बियाणे कोठून आणायचे असा प्रश्न शेतकर्‍यांपुढे पडला आहे. एकूणच बियाणांच्या अत्यल्प उत्पादनामुळे बियाणांचा काळा बाजार करणारेही पुढे सरसावणार आहेत. बियाणांचा होणारा तुटवडा व शेतकर्‍यांची वाढती मागणी याबाबतीत कृषी विभागही धास्तावला आहे. एकूणच यावर्षी सेयाबीन उत्पादक मोठ्या अडचणीत सापडला आहे. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे म्हणाले की, अवकाळी पावसाने सोयाबीनच्या बियाणांचा दर्जा खालावल्यामुळे उगवण शक्ती कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपल्याच बियाणांची खात्रीने पेरणी करावी असेही कांबळे यांनी सांगितले.