शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान

By admin | Updated: August 21, 2014 00:20 IST

शिवाजी राजूरकर, नवीन नांदेड सुमारे ९ एकर क्षेत्रफळात तयार झालेली नांदेडच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाची इमारत राज्यातील नव्हे तर देशातील सर्वात भव्य आणि अद्ययावत अशी वास्तू असणार आहे.

शिवाजी राजूरकर, नवीन नांदेडसुमारे ९ एकर क्षेत्रफळात तयार झालेली नांदेडच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाची इमारत राज्यातील नव्हे तर देशातील सर्वात भव्य आणि अद्ययावत अशी वास्तू असणार आहे. सुमारे ११ कोटी ८४ लाख रुपये इमारतीवर खर्च झाले आहेत. ही इमारत नागरिकांसाठी अत्याधुनिक सोयी- सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालयात नागरिकांच्या दैनंदिन जीवनातल्या आवश्यक अशा मूलभूत सुविधाही येत्या काही दिवसात अनुभवता येतील. यामध्ये बँक, एटीएम, टी.व्ही., कॉन्फरन्स रुम आदींचा समावेश असणार आहे. या सुविधांमुळे कामाला गती प्राप्त झाली असून, कार्यालयीन कर्मचारी आणि येणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचणार आहे. कार्यालयात चालकांना उत्तम ड्रायव्हिंग आणि मानवीय, सामाजिक मूल्यांशी अवगत करण्याच्या हेतूने प्रशिक्षण कक्ष तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी रोड सेफ्टी मॉड्युलच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाील. लवकरच इमारतीच्या आवारात सिम्युलेटर यंत्रासाठी विशेष हाौल तयार करण्यात येणार असून, शिकाऊ चालकांना ड्रायव्हींगविषयी माहिती दिली जाणार आहे.प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नांदेड येथे १ आॅक्टोंबर २००३ पासून कार्यान्वित झाले आहे. कार्यालयात वाहन नोंदणी व अनुज्ञप्तीसाठी संगणकीकृत व अत्याधुनिक वाहन व सारथी प्रणाली कार्यरत आहे. शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी ओरीयंटची संगणक चाचणी प्रणाली व पक्या अनुज्ञप्तीसाठी नवीन इमारतीमध्ये अत्याधुनिक चाचणी पथक तयार करण्यात आले. या इमारतीचे उद्घाटन उद्या दि.२१ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, पालकमंत्री डी.पी. सावंत, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, परिवहन आयुक्त एस.बी. सहस्त्रबुद्धे, जिल्हाधिकारी धीरजकुमार आदींसह मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे विनोद सगरे यांनी सांगितले.