शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

पिकली पानेच ठरताहेत सॉफ्ट टार्गेट

By admin | Updated: May 27, 2014 01:01 IST

नांदेड : खुनासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे तर त्याचबरोबर सोनसाखळी, लुबाडणे आदी घटनांमध्ये ज्येष्ठ नागरीकांनाच अधिक लक्ष केले जात असल्याचे उघडकीस आले आहे़

नांदेड : खुनासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे तर त्याचबरोबर सोनसाखळी, लुबाडणे आदी घटनांमध्ये ज्येष्ठ नागरीकांनाच अधिक लक्ष केले जात असल्याचे उघडकीस आले आहे़ क्राईम रेकार्डस ब्युरोने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २००७ पासून महाराष्ट्रात १ हजार ६७९ ज्येष्ठ नागरिकांचे खून झाले आहेत़ नांदेडातही अशा खुनाच्या घटना घडल्या आहेत़ कधी एकटे राहत असल्याचे पाहून त्यांचे घर लुटले जाते़ तर कधी रस्त्यावर अडवून पोलिस असल्याचे भासवून त्यांना लुबाडले जाते़ स्थावर मालमत्तेच्या प्रकरणात तर नात्यातीलच व्यक्ती या हतबल वृद्धांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवित असल्याचे अनेक उदाहरणे पहावयास मिळाली़ नांदेडात तर असे प्रकार सर्रासपणे पहावयास मिळतात़ सकाळी किंवा सायंकाळी फिरायला बाहेर पडलेल्या या पिकल्या पानांना भामटे अतिशय अलगदपणे टार्गेट करतात़ मुलाबाळांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी आयुष्यभर झटणार्‍या या पिकल्या पानांना आता उरलेल्या आयुष्यातही हिंसक संघर्षाचा सामना करावा लागत आहे़ अशा गुन्ह्याच्या प्रमाणात महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात १४० टक्कयांनी वाढ झाली आहे़ याबाबत पोलिस दलाकडून वृद्धांसाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे़ परंतु महिला हिंसाचार याबरोबरच वृद्धांसाठी असलेली हेल्पलाईन नावालाच असल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यामुळे याबाबतीत तातडीने पाऊले उचलण्याची गरज आहे़ आर्थिक फसवणुकीत ज्येष्ठांचाच बळी आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये ज्येष्ठांचाच सर्वाधिक समावेश असल्याची बाब समोर आली आहे़ रिझर्व्ह बँक आणि सेबीने खोट्या मोहाला, आमिषांना बळी पडू नका असा सावधानतेचा इशारा दिला होता़ मात्र तरीदेखील बोगस कंपन्यामध्ये पैसे गुंतविणे सुरुच आहे़ हे सर्व भामटे उच्चशिक्षित असून भोळ्याभाबड्या ज्येष्ठांनाच जाळ्यात ओढतात़ घर का भेदीच जास्त धोकादायक मुले बाहेरगावी किंवा परदेशी असल्याने घरामध्ये एकटेच राहणार्‍या ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता हे मोठेच आव्हान आहे़ ज्येष्ठ महिला कौटुंबिक छळापासून साखळी चोरांचे लक्ष्य ठरत आहेत़ विशेष म्हणजे नात्यातील व्यक्ती ज्येष्ठ नागरीकांच्या छळास कारणीभूत ठरत आहेत़ कायदा काय सांगतो? फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १२५ कलमान्वये पालकांचा सांभाळ व निर्वाहासाठी लागणार्‍या पैशांची पूर्तता करण्याची जबाबदारी मुलगा आणि मुलगी या दोघांवर असते़ हा निर्वाहभत्ता न दिल्यास दंड आणि कारावासाची शिक्षा संबंधितांना होवू शकते़ त्याचबरोबर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी किंवा कौटुंबिक न्यायालयातही ज्येष्ठ नागरिक फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १२५ कलमान्वये अर्ज करु शकतात़ सुशिक्षितांचा गुन्हेगारी फॉर्म्युला गेल्या काही वर्षांत आणि इंटरनेटच्या प्रसारामुळे लोकांना फसवायचे नवेच तंत्र गुन्हेगारांना मिळाले आहे़ परिणामी सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे़ सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिमाणकारक यंत्रणाही नाही़ त्यामुळे इंटरनेटद्वारे फसविणार्‍यांची संख्या वाढतच आहे़ लोकांना अधिक नफा, व्याजाचे आमिष दाखविणार्‍या खोट्या कंपन्या काढल्या गेल्या़ पद्धतशीरपणे त्याचे दिवाळे काढून गुंतवणुकदारांना बुडवून हे भामटे पसार होतात़