शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

पोखर्णी होणार स्मार्ट व्हिलेज

By admin | Updated: April 23, 2016 23:56 IST

श्रीनिवास भोसले, नांदेड नांदेड तालुक्यातील पोखर्णी हे ५८८ लोकसंख्या असलेले छोटेसे गाव स्मार्ट व्हिलेजकडे वाटचाल करू पाहत आहे़

श्रीनिवास भोसले, नांदेड नांदेड तालुक्यातील पोखर्णी हे ५८८ लोकसंख्या असलेले छोटेसे गाव स्मार्ट व्हिलेजकडे वाटचाल करू पाहत आहे़ गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांसह शिक्षकांनी पुढाकार घेतला असून या कार्याची सुरूवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून केली आहे़ शाळेतील वर्गखोल्या डिजिटल करण्याकरिता १०३ उंबरठ्याच्या गावात लोकवर्गणाीतून ८३ हजार रूपये वर्गणी जमा झाली आहे़ तर केंद्रातील शिक्षकमित्रांनी ६८ हजारांचा निधी दिला आहे़ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांचा चेहरामोहरा बदलत असून गुणवत्तेतदेखील दिवसेंदिवस वाढ होत आहे़ डिजिटल वर्ग बनविण्याकरिता ठिकठिकाणी पुढाकार घेतला जात आहे़ जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविल्या जात असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहण्याची गोडी निर्माण होत आहे़ नांदेड तालुक्यातील पोखर्णीच्या सरपंच जयश्री शिंदे आणि ग्रामस्थांनी गावात राष्ट्रपुरूषांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून गाव स्मार्ट व्हिलेज बनविण्याकडे वाटचाल सुरू केली आहे़ शाळेच्या विकासाला प्राधान्य देत सरंपच शिंदे यांनी मुख्याध्यापक विनायक बारहाते यांच्या पुढाकारातून संपूर्ण शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत़ या कार्यात गावकऱ्यांनीदेखील हिरीरिने सहभाग नोंदवत दुष्काळीस्थितीतही ८३ हजार रूपये लोकवर्गणी गोळा करून दिली़ पोखर्णी जि़प़शाळेत पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेत ४३ विद्यार्थी शिक्षण घेतात़ येथील डिजिटल वर्ग खोलीचे काम अंतिम टप्प्यात आहे़ तत्पूर्वी मुख्याध्यापक बारहाते यांनी टॅब आणि लॅपटॉपचा वापर करीत विद्यार्थ्यांमध्ये संगणक आणि स्मार्ट एज्युकेशनची आवड निर्माण केली आहे़ शैक्षणिक साहित्याचा वापर करीत विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत़ सदरील साहित्य ठेवण्याकरिता ग्रामपंचायत सदस्यांनी अभिव्यक्ती फलक शाळेला भेट दिला आहे़ शाळेच्या भिंतीवरील चित्रातून शिक्षण, पुस्तक, वाचन आदीचे महत्व स्पष्ट होते़ चारोळ्या, संदेश आणि बोलक्या चित्रांनी शाळेच्या भिंती रंगल्याने शाळेचा परिसर प्रसन्न वाटतो़ यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होते़