शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

आधार जोडणीचे काम मंदगतीने

By admin | Updated: March 20, 2016 02:13 IST

परभणी : रेशनकार्डाला आधार क्रमांक जोडण्याचे काम जिल्ह्यात संथगतीने सुरू असून, वेळेत आधार क्रमांक लिंक न झाल्यास शासनाच्या योजनांपासून लाभधारक वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

परभणी : रेशनकार्डाला आधार क्रमांक जोडण्याचे काम जिल्ह्यात संथगतीने सुरू असून, वेळेत आधार क्रमांक लिंक न झाल्यास शासनाच्या योजनांपासून लाभधारक वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.राज्य शासनाने शिधापत्रिकांना आधार क्रमांक जोडण्याचा कार्यक्रम वर्षभरापूर्वी हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक शिधापत्रिकाधारक नागरिकांची अद्ययावत माहिती आॅनलाईन नोंदवून घेतली जाते. त्यात शिधापत्रिका धारकाचे नाव, सदस्यांची नावे, सर्व सदस्यांचे आधार क्रमांक, कुटुंबप्रमुख महिलेचा फोटो आणि कुटुंबप्रमुख महिला सदस्याचे बँक खाते क्रमांकाची नोंद घेतली जात आहे. परभणी जिल्ह्यामध्ये नांदेड येथील एम.एस. कॉम्प्युटर अ‍ॅण्ड मल्टी सर्व्हिसेस या एजन्सीला हे काम देण्यात आले आहे. प्रतिशिधापत्रिका ५ रुपये या दराने एजन्सीला हे काम दिले असून एजन्सी आधार क्रमांकाची नोंदणी करुन घेत आहे. या अंतर्गत महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तलाठी आदी कर्मचाऱ्यांनी शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक, शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत आणि आवश्यक माहिती जमा करुन एजन्सीला देणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात १९ लाख ३ हजार ७६४ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी केवळ ११ लाख ३० हजार ४८३ शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक शिधापत्रिकेला जोडले आहेत. ही टक्केवारी केवळ ५९.६८ टक्के एवढी आहे. राज्यात शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडण्याच्या कामाला गती घेतली असताना परभणी जिल्ह्यात मात्र हे काम रखडले आहे. प्रशासकीय आणि नागरिकांची या कामात उदासिनता दिसून येत आहे. (प्रतिनिधी)अन्नसुरक्षा : परभणी जिल्हा राज्यात तिसराजिल्ह्यातील शिधापत्रिकांना आधार क्रमांक जोडण्याचे काम रखडले असले तरी याच जिल्ह्यातील अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत असलेल्या शिधापत्रिकांना आधार क्रमांक जोडण्याचे काम मात्र उल्लेखनीय झाले आहे. या कामाची राज्य- निहाय आकडेवारी प्राप्त झाली. परभणी जिल्ह्यात अंत्योदय आणि अन्नसुरक्षा योजनेतील ९४.२८ टक्के लाभार्थ्यांचे शिधापत्रिका आणि आधार क्रमांक लिंक झाले आहेत. या आकडेवारीच्या जोरावर जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे.