शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
3
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
4
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
5
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
6
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
7
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
8
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
9
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
10
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
11
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
13
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
14
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
15
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
16
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
17
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
18
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
19
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
20
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...

शहरात २०२१ मध्ये महिलांविषयी गुन्ह्यात किंचित वाढ; सतर्क पोलिसांनी ही गुन्हेगारांना दाखवली जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 7:08 PM

आपल्या शहरातील महिला खरंच सुरक्षित आहेत का?

- बापू सोळुंकेऔरंगाबाद : महिलांच्या सुरक्षिततेविषयी सतत चर्चा होत असते. महिलांसाठी शहर सुरक्षित असल्याचा दावाही वेळोवेळी पोलिसांकडून केला जातो. मात्र, गतवर्षी महिलांविषयी झालेल्या घटनांचा विचार करता शहरातील महिला खरंच सुरक्षित आहेत का, असा सवाल उपस्थित होतो.

२०२० या वर्षाच्या तुलनेत शहरातील महिलांसंबंधीचे गुन्हे किंचित वाढले आहेत. गतवर्षी दोन महिलांचे खून, सहा महिलांच्या खुनाचे प्रयत्न झाले. बलात्काराच्या ८८ तर १९९ विनयभंगाच्या घटनांची नोंद झाली. मात्र, पोलिसांनी बहुतेक गुन्हेगारांना त्यांची जागा दाखविली. गतवर्षी २०२१ साली पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल झालेल्या ६७९ पैकी ६६० गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली.

अपहरण झालेल्या महिला, मुलींचे काय होते ?अल्पवयीन मुली अथवा १८ वर्षांपुढील महिलांच्या अपहरणाची तक्रार प्राप्त होताच पोलीस अशा महिलांचा शोध घेतात. अल्पवयीन मुलींच्या गुन्ह्यांचा तपास फौजदार दर्जाचे अधिकारी करतात. बहुतेक मुली प्रेमप्रकरणातून स्वतःहून निघून जातात. तर काहींना फूस लावून पळवून नेण्यात येते. अशा मुली, महिलांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक असते.

मुलांना चांगले संस्कार द्यावे आज सर्वच क्षेत्रांत महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. महिलांना कमजोर समजून अत्याचार करण्याची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. पालकांनी लहानपणापासून मुलांना महिला, मुलींचा आदर करायला शिकविले तरच महिलांसंबंधी गुन्हे कमी होतील.-वैभव घुले, सामाजिक कार्यकर्ता.

महिलांसंबंधी दाखल झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारीसन २०१९----- २०२०-------२०२१खून- ०९-------००-------०२खुनाचा प्रयत्न--११----०३----०६हुंडाबळी-----०३-----०४-----०५आत्महत्या----१८-------११---१०बलात्कार--८५-----८४----८८अपहरण---१३०----९७-----१००विनयभंग---३०१----२४५----१९९अनैतिक देह व्यापार--०३-----०७---०१मंगळसूत्र चोरी- ३८---२४विवाहितेचा छळ--२०६-----२६२

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला