शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणप्रकरणी सहा जणांना अटक व सुटका

By admin | Updated: September 11, 2014 01:08 IST

लातूर : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत दोन मंडळांच्या पदाधिकाऱ्यात मिरवणूक पुढे घेण्याच्या कारणावरून सोमवारी रात्री तुंबळ हाणामारी झाली होती़

लातूर : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत दोन मंडळांच्या पदाधिकाऱ्यात मिरवणूक पुढे घेण्याच्या कारणावरून सोमवारी रात्री तुंबळ हाणामारी झाली होती़ या प्रकरणी गांधी चौक पोलिसांनी एका गटाच्या सहा जणांना बुधवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींची जामीनावर मुक्तता केली आहे. लातूर शहरात सोमवारी रात्री श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात सुरू होत्या. गंजगोलाई येथे विसर्जन मिरवणूक आली असता अमर गणेश मंडळाच्या मिरवणुकीला बाजूला सारण्यासाठी अन्य एका गणेश मंडळाने गोंधळ घातला. कुरबुरीचे तुंबळ हाणामारीत रुपांतर झाले. यात एकजण जखमी झाला. प्रारंभी, पोलिसांनी बघ्याचीच भूमिका घेतली. मात्र परिस्थिती बिघडण्याची शक्यता लक्षात येताच पोलिस कुमक वाढवून मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, त्याचवेळी गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींची जामिनावर मुक्तता केली आहे.अमोल अंधारे व राहूल अंधारे यांच्यासह त्यांच्या गणेशमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भांडणास सुरूवात केली़ अमर गणेश मंडळाची मिरवणूक थांबवून आमची मिरवणूक पुढे घेण्याचा आग्रह त्यांनी धरला होता. या प्रकरणी पोलिसांनी गांधी चौक पोलिसात फिर्याद देऊन अमोल अंधारे, राहुल अंधारे, प्रसाद बावगे, कृष्णा हाके, मनोज बागरेच्या, आनंद कैले या सहा जणांना गांधी चौक पोलीसांनी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास गांधी चौक पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. परंतु, न्यायालयात पुरावे सादर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली़ शिवाय, गांधी चौक पोलिसांकडून त्यांच्यावर १०७ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करून बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांना सोडून देण्यात आले़(प्रतिनिधी)