धक्कादायक! वाढदिवसासाठी घरी आलेल्या दोन भाच्यांचा मामीवर अत्याचार; पतीही आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 16:35 IST2025-12-01T16:32:34+5:302025-12-01T16:35:01+5:30
मामीने दोन भाच्यांसह पतीच्या विरोधात अत्याचाराची तक्रार देत गुन्हा नोंदवला आहे अल्पवयीन भाच्याचीसुद्धा मामीविरोधात 'पोक्सो'ची तक्रार

धक्कादायक! वाढदिवसासाठी घरी आलेल्या दोन भाच्यांचा मामीवर अत्याचार; पतीही आरोपी
छत्रपती संभाजीनगर : मुलीच्या वाढदिवसासाठी घरी आलेल्या दोन भाच्यांसह पतीने पत्नीला दारू पाजून तिघांनी तिच्यावर अत्याचार केले. ही घटना देवळाई परिसरात ५ जुलै २०२४ ते १५ मे २०२५ या काळात वारंवार घडली. अश्लील व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकीही दिली. याप्रकरणी पीडित मामीच्या तक्रारीवरून दोन भाच्यांसह पतीच्या विरोधात नवी मुंबई येथे गुन्हा नोंद होऊन शनिवारी (दि.२९) चिकलठाणा पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० वर्षीय विवाहिता देवळाई परिसरात राहते. तिचा पती तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी नेहमी बळजबरीने दारू पाजायचा. तिच्या मुलीच्या वाढदिवसाला पतीचे दोन भाचे घरी आले होते. त्या दिवशीही विवाहितेला पतीने दारू पाजून अगोदर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोनपैकी एका अल्पवयीन भाच्यानेही तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. एका भाच्याचा शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ बनविला. तो पीडितेला दाखवून त्यानंतर वारंवार तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करून छळ करू लागले. या प्रकाराला कंटाळून अखेर पीडितेने नवी मुंबई येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा नोंदवला. तो गुन्हा चिकलठाणा पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक निरीक्षक समाधान पवार करत आहेत.
मामीच्या विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा
चिकलठाणा पोलिसांच्या माहितीनुसार पीडित विवाहिता अल्पवयीन भाच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होती. हा प्रकार पतीच्या निदर्शनास आल्यानंतर भाच्यावर अत्याचार होत असल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात अल्पवयीन भाच्याच्या तक्रारीवरून मामीच्या विरोधात पोक्सो कायद्यान्वये चिकलठाणा पोलिस ठाण्यातच सप्टेंबर महिन्यातच गुन्हा नोंदविला. त्यानंतर मामीने दोन भाच्यांसह पतीच्या विरोधात अत्याचाराची तक्रार देत गुन्हा नोंदवल्याचेही चिकलठाणा पोलिसांनी सांगितले.