शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

वंचितचे धक्कातंत्र, ऐनवेळी स्वतःच्या उमेदवारालाच नाकारला 'एबी' फॉर्म

By सुमेध उघडे | Updated: April 24, 2024 19:21 IST

औरंगाबादमधून माजी नगरसेवक अफसर खान आता अपक्ष लढणार आहेत

छत्रपती संभाजीनगर: वंचित बहुजन आघाडीने काही जागांवरचे उमेदवार बदलल्यानंतर आता आणखी एक धक्का दिला आहे. औरंगाबाद लोकसभेसाठी जाहीर केलेले उमेदवार अफसर खान यांना वंचितने एबी फॉर्म नाकारला आहे. यामुळे अफसर खान आता उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक अफसर खान यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी प्रचार देखील सुरू केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडी, महायुतीच्या उमेदवारांसह काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, एबी फॉर्म नाकारत वंचितने अफसर खान यांना मोठा धक्का दिला आहे. उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर काही ठिकाणी लागलीच उमेदवार बदल वंचितने केला आहे. त्यानंतर आता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना थेट एबी फॉर्म नाकारत वंचितने उमेदवारास धक्का दिल्याने राजकीय गोटात चर्चा सुरू झाली आहे. अफसर खान आता लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढणार आहेत. उद्या ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.

वंचित नवा उमेदवार देणार का?
काही दिवसांपूर्वी एमआयएमने अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर एमआयएमचे उमेदवार खासदार जलील यांच्या विरोधातील उमेदवारास एबी फॉर्म वंचितने नाकरला. यामुळे वंचित आता दूसरा उमेदवार देणार की एमआयएमच्या उमेदवारास पाठिंबा देणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

वंचितने 'या' ठिकाणी बदलले उमेदवार
राज्यात सर्वात प्रथम लोकसभेसाठी वंचितने उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर वंचितने काही ठिकाणी  उमेदवार बदलले. रामटेक, वाशिम- यवतमाळ, परभणी, दिंडोरी येथे पक्षाने उमेदवार बदलले आहेत. तर आता औरंगाबादच्या उमेदवारास शेवटच्या क्षणी थेट 'एबी' फॉर्म नाकारत वंचितने पुन्हा एकदा नवीन राजकीय फासे टाकले आहेत.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४