धक्कादायक! विमानात महिला व्यावसायिकासोबत अश्लील कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 10:59 IST2024-09-04T10:58:55+5:302024-09-04T10:59:58+5:30

Crime News: महिला व्यावसायिकासोबत विमानात सहप्रवाशाने अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर प्रवासादरम्यान २ सप्टेंबरला इंडिगोच्या सायंकाळच्या विमानात हा प्रकार घडला.

Shocking! Indecent act with female businessperson on plane | धक्कादायक! विमानात महिला व्यावसायिकासोबत अश्लील कृत्य

धक्कादायक! विमानात महिला व्यावसायिकासोबत अश्लील कृत्य

छत्रपती संभाजीनगर -  महिला व्यावसायिकासोबत विमानात सहप्रवाशाने अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर प्रवासादरम्यान २ सप्टेंबरला इंडिगोच्या सायंकाळच्या विमानात हा प्रकार घडला. याप्रकरणी आसीफ खान अन्वर अहमद (३९, रा. कटकट गेट) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

५५ वर्षीय तक्रारदार महिला  कामानिमित्त दिल्लीला गेल्या होत्या. सहकाऱ्यांसोबत सोमवारी शहरात येण्यासाठी निघाल्या. दुपारी दिल्ली विमानतळावरून इंडिगो विमानाने उड्डाण घेतले. मागच्या सीटवर आसीफ कंपनीच्या सहकाऱ्यांसोबत प्रवास करीत होता. प्रवास सुरू होताच आसीफचा महिलेला स्पर्श झाला. सुरुवातीला चुकून स्पर्श झाल्याचे समजून महिलेने दुर्लक्ष केले. मात्र, छत्रपती संभाजीनगरात विमान उतरण्याच्या काही मिनिटे आधी पुन्हा सीटच्या पाठीमागून हात घालून त्याने स्पर्श केला. सातत्याने हा प्रकार घडत असल्याने महिलेने विमानातच आक्षेप घेत त्याला जाब विचारला.  महिलेने विमानतळावर पोहोचताच पोलिसांना बोलाविले. काही वेळाने दाखल झालेल्या पोलिसांनी आसीफला ताब्यात घेत ठाण्यात नेले.  नोटीस बजावून सोडले. 

Web Title: Shocking! Indecent act with female businessperson on plane