शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सेलू पालिकेवर शिवसेनेचा मोर्चा

By admin | Updated: August 3, 2014 00:59 IST

सेलू : शहरातील प्रभाग तीन मध्ये पाणीपुरवठा होत नसून महेशनगरात नवीन पाईपलाईन बदलून द्यावी आदी मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने नगर पालिका कार्यालयावर शनिवारी दुपारी पाच वाजता मोर्चा काढून

सेलू : शहरातील प्रभाग तीन मध्ये पाणीपुरवठा होत नसून महेशनगरात नवीन पाईपलाईन बदलून द्यावी आदी मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने नगर पालिका कार्यालयावर शनिवारी दुपारी पाच वाजता मोर्चा काढून मुख्याधिकारी जगताप यांना धारेवर धरण्यात आले़ शहरातील प्रभाग तीन मधील शिवाजीनगर, विद्यानगर, तेली गल्ली, पांडे गल्ली या भागात नवीन पाईप लाईन ने पाणीपुरवठा करण्यात यावा व शहरात होत असलेला दूषित पाणी पुरवठा बंद करावा या मागण्यांसह श्रीरामजी भांगडिया उद्यानाचे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात येत आहे़ तसेच शनिवारची नगर पालिकेची सर्वसाधारण सभा रद्द करावी, ऩ प़ तील सत्ताधारी खोटे कामे करून भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप करीत शिवसेना नगरसेवकांनी मोर्चा काढला़ या मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता़ नगरपालिका कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना रोखले. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी पालिका कार्यालयासमोर रिकामे मडके फोडून संताप व्यक्त केला़ मोर्चेकरी आक्रमक झाल्याचे पाहताच प्रभारी मुख्याधिकारी जगताप यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले़ शहरातील अनेक भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे़ डॉ़ आंबेडकरनगरमध्ये जाणीवपूर्वक नवीन पाईपलाईन टाकण्यास विलंब करीत असल्यामुळे या नगरातील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे़ तर ज्या भागात पाणी सोडण्यात येते ते पाणी गाळमिश्रीत येत आहे. त्यामुळे मोर्र्चातील महिलांनी दूषित पाण्याने भरलेल्या बाटल्या सोबत आणून याबाबतची विचारणा करून मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले़ त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात सेनेचे नगरसेवक संदीप लहाने, मंगलताई कथले, संजय धापसे, संध्या चिटणीस, अन्नपूर्णाताई शेरे, तसेच महिला आघाडीच्या सखुबाई लटपटे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे या बाबीचा जाब विचारला त्यामुळे काही काळ पालिकेतील वातावरण तणावपूर्ण बनले होते़ या मोर्चात शिवाजीनगर, शेरे गल्ली, पांडे गल्ली, विद्यानगर आदी भागातील महिला सहभागी झाल्या होत्या़ (प्रतिनिधी)भाजपा पदाधिकाऱ्यांचे निवेदन शिवसेना नगरसेवकांनी पुढाकार घेवून पालिका प्रशासनाच्या विरोधात आयोजित केलेल्या मोर्चात भाजप चे स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले़ भाजपच्या वतीने शहरातील वाढीव पाणी पट्टी रद्द करून जुन्या दराने स्वीकारावी, श्रावण महिन्यात उघड्यावरची मांसविक्री व कातडे वाळविणे हे प्रकार बंद करावे व मुख्य रस्त्यावर लावण्यात येणारे हातगाडे हटवून वाहतूक सुरळीत करावी, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, मारवाड गल्लीत रस्त्यावर गतीरोधक बसविण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांकडे शहराध्यक्ष नितीन सुरवसे, तालुकाध्यक्ष अशोक खताळ, विश्वास राजवाडकर, विलास लांडे, हर्षल शिंदे, पंकज कुलकर्णी, गोविंद लोया यांनी सादर केले़