शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदी शेख बिनविरोध; उपमहापौर कांबळे ‘जिंकले’

By admin | Updated: November 13, 2014 00:52 IST

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे अख्तर शेख यांची बिनविरोध निवड झाली,

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे अख्तर शेख यांची बिनविरोध निवड झाली, तर उपमहापौरपदी कैलास कांबळे हे ५० मते घेत ४२ मतांनी शिवसेनेच्या संभाजी बसपुरे यांचा पराभव करून निवडून आले. बसपुरे यांना ८ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी महापौरपदी अख्तर शेख व उपमहापौरपदी कैलास कांबळे यांची निवड झाल्याचे घोषित केले.लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौरांची २० नोव्हेंबर रोजी मुदत संपणार असल्याने नव्या महापौरांची १२ नोव्हेंबर रोजी निवड करण्यात आली. महापौरपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी तर उपमहापौर पदासाठी काँग्रेस विरुद्ध शिवसेना उमेदवार आमने-सामने होते. बुधवारी विशेष सभेत हात उंचावून मतदान घेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवार दीपाली इंद्राळे यांनी अर्ज माघार घेतला. उपमहापौरपदासाठीही दोन अर्ज वैध ठरले. काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी निवडणूक झाली. यात काँग्रेसचे कैलास कांबळे यांना ५० तर शिवसेनेचे बसपुरे यांना ८ मते मिळाली. निवडीनंतर महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे यांचा मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, काँग्रेसचे गटनेते नरेंद्र अग्रवाल, राकाँचे गटनेते मकरंद सावे, रिपाइंचे गटनेते चंद्रकांत चिकटे, शिवसेनेच्या गटनेत्या सुनीता चाळक यांनी सत्कार केला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदेकर, उप जिल्हाधिकारी विकास खपले, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे यांची उपस्थिती होती. प्रारंभी महापौरपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. (प्रतिनिधी)सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. महापौरपदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार दीपाली इंद्राळे यांनी माघार घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार अख्तर शेख यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर उपमहापौरपदाच्या निवडीचा कार्यक्रम सुरू झाला. माघार घेण्यासाठी १५ मिनिटांची वेळ देण्यात आली होती. मात्र मुदतीत अर्ज माघार घेण्यात आला नसल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात कैलास कांबळे यांना काँग्रेसचे ४८, रिपाइंचे २ अशी ५० मते मिळाली. तर शिवसेनेचे उमेदवार संभाजी बसपुरे यांना शिवसेनेचे ६ व राष्ट्रवादी काँग्रेसची २ अशी ८ मते मिळाली. खा. रामदास आठवलेंची रिपाइं लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेत यापूर्वी ‘शिवशक्ती’सोबत राहिली आहे. परंतु, आता महायुती तोडून ती काँग्रेससोबत जोडली गेली.