शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

तिने केला प्रसूतीचा बनाव

By admin | Updated: December 18, 2015 23:50 IST

वैजापूर : लग्न होऊन पाच वर्षांनंतरही बाळ होत नसल्याने ‘वांझोटी’ असल्याचे टोमणे समाज मारत होता, तर सासरची मंडळी मानसिक त्रास देत होती.

वैजापूर : लग्न होऊन पाच वर्षांनंतरही बाळ होत नसल्याने ‘वांझोटी’ असल्याचे टोमणे समाज मारत होता, तर सासरची मंडळी मानसिक त्रास देत होती. त्यातून मुक्त होण्यासाठी अखेर ‘त्या’ विवाहितेने गरोदर राहिल्याचा बनाव करून तब्बल ९ महिने गरोदरपणाचे नाट्य वठविले. दिवस भरल्याचे सांगत औरंगाबाद गाठून अपहरण, बळजबरीची प्रसूती व जुळी बाळे घेऊन आरोपीचे पलायन आणि पुन्हा तिची पतीशी भेट, हिंदी चित्रपटात शोभेल, अशी शक्कल लढविल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. खोट्या सामाजिक प्रतिष्ठेपायी या महिलेने कुटुंबीय, डॉक्टर व पोलिसांची दिशाभूल केली. वैजापूर तालुक्यातील पानगव्हाण येथील कविता सुनील कटारे हिला लग्न होऊन पाच वर्षे उलटल्यानंतरही मूलबाळ झाले नव्हते. त्यामुळे घरच्या मंडळींसह समाजातून सतत टोमणे मारले जात होते. त्यामुळे कंटाळलेल्या कविताने अखेर गरोदर राहिल्याचे नाट्य सुरू केले. औरंगाबाद येथे तपासणी केल्याचा बनाव करून आपल्याला दिवस गेल्याचे तिने घरच्यांना सांगितले. जसे जसे दिवस वाढत होते, तसे कविताने गरोदर दिसावे यासाठी पोटाला कधी टॉवेल, तर कधी उशी गुंडाळून घरच्यांच्या डोळ्यात धुळफेक केली. तब्बल ९ महिने हा बनाव चालला. दिवस पूर्ण भरले, तशी ती बाळंतपणासाठी औरंगाबादेत आपल्या नातेवाईकांकडे आली. प्रसूती कळा येत असल्याचे भासवून बुधवारी ती पतीसह दवाखान्यात गेली व काही तरी कारण सांगून पतीला थोडेसे बाजूला केले आणि स्वत:च पलायन केले. त्यानंतरचे तिचे अपहरण, कुणीतरी तिची प्रसूती करून घेतो व जन्मलेले जुळे घेऊन पळून जातो. तिला बाबा पेट्रोल पंपावर आणून टाकले जाते, असा सारा घटनाक्रम रचण्यात आला. पती सुनील तिला घेऊन गावी पानगव्हाणला गेल्यानंतर घरच्या मंडळीने तिला वैजापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर पती व सासरा यांनी थेट औरंगाबाद गाठून सिडको पोलीस ठाण्यात याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे हलवीत थेट वैजापूर गाठून त्या महिलेची चौकशी केली. तेव्हा अपहरण व प्रसूतीच्या घटनेवरील पडदा हटला. पुढील चौकशीसाठी औरंगाबाद पोलीस महिलेला सोबत घेऊन गेले आहेत. डॉक्टरचीही केली दिशाभूल औरंगाबादहून बुधवारी गावात परतल्यानंतर कविताला वैजापूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेव्हादेखील डॉक्टरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. सदर महिलेची प्रसूती घरी झाली असून, बाळे घरीच असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे डॉक्टरांनी महिलेला तपासण्याचा प्रयत्न केला असता कविताने तपासणी करण्यास नकार दिला. तेव्हाच डॉक्टरांना तिच्यावर संशय आला होता. पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित कविता हिचे शिक्षण बी.ए.पर्यंत झालेले आहे, तर तिचा पती एम.ए. झालेला आहे, असे असतानाही गरोदरपणाचे बनावट नाट्य पतीच्या लक्षात कसे आले नाही. पती-पत्नीने सहमतीने तर हे नाटक रचले नसावे ना या दिशेने आता पोलीस तपास करीत आहेत.