शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शहागंज बसस्थानक टाकणार कात

By admin | Updated: July 21, 2014 00:35 IST

औरंगाबाद : औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागेवर बीओटी तत्त्वावर अद्ययावत आणि सुसज्ज बसस्थानक बांधण्यासाठी एस. टी. महामंडळाने मागविलेल्या निविदांना कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला आहे.

औरंगाबाद : औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागेवर बीओटी तत्त्वावर अद्ययावत आणि सुसज्ज बसस्थानक बांधण्यासाठी एस. टी. महामंडळाने मागविलेल्या निविदांना कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला आहे. निविदा प्रक्रिया सुरू असून, आता एस. टी. च्या ‘बीओटी’चे पुढील लक्ष्य आहे, शहागंज येथील बसस्थानकाची जागा. ही जागाही बीओटीवर विकसित करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.शहागंज बसस्थानकातून पूर्वीप्रमाणे बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. महामंडळाची येथे जवळपास दोन एकर जागा असून, येथील बससेवा बंद पडल्यापासून ही जागा पडून आहे. ही जागा बीओटी तत्त्वावर विकसित केल्यास एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात भर पडेल, यादृष्टीने महामंडळाची ही जागा बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा विचार केला जात आहे. या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याबाबत विचाराधीन असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती.राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे नुकतेच शहर आणि परिसरातील महामंडळाच्या जागा बघण्यासाठी आले होते. शहागंज येथील जागेत बीओटीवर कॉम्प्लेक्स तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आता मध्यवर्ती बसस्थानकानंतर शहागंज येथील जागा बीओटी तत्त्वावर विकसित केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले.सुविधा मिळणार?शहर विस्तारत असल्यामुळे महामंडळाच्या या जागांवर प्रकल्प राबविल्यानंतर आगामी काही वर्षांत एस. टी. च्या विस्तारासाठी महामंडळाला स्थानकासाठी जागा शोधावी लागेल ती शहराच्या हद्दीबाहेर. त्यासाठी कोट्यवधींची गुंतवणूक महामंडळाला करावी लागेल. वाहतुकीच्या वर्दळीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना बसस्थानकात सध्या मिळत असलेल्या सुविधांमध्ये या प्रकल्पानंतर वाढ होईल का, असा प्रश्न प्रवाशांसमोर आहे.शहागंजमधून दर दहा मिनिटांनी निघेल बस १ आॅगस्टपासून शहर बससेवेत वाढ केली जाणार असून, प्रारंभी महावीर चौक- चिकलठाणा, शहागंज- रेल्वेस्थानक या दोन मार्गांवर बससेवेत वाढ केली जाणार आहे. या मार्गावर दर दहा मिनिटांनी बस धावणार असून त्यामुळे अधिक चांगली सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. बससेवा राहील?शहागंज परिसरात वाढलेली अतिक्रमणे, रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने, यामुळे बससेवा सुरू करण्यास अडचणी असल्याचे सांगितले जाते. या जागेवर व्यापारी संकुल बांधण्याचा घाट घातला जात आहे का?, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. बससेवेसाठी जागाशहागंज येथील जागेत व्यापारी संकुलाबरोबर बससेवेसाठीही जागा राहील. त्यामुळे या जागेवर केवळ व्यापारी संकुल राहणार नसल्याचे विभाग नियंत्रक संजय सुपेकर यांनी सांगितले.