शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

बिलासाठी ससेहोलपट

By admin | Updated: April 16, 2016 00:05 IST

व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड जिल्हा रूग्णालयातील तुघलकी कारभाराचा फटका वैद्यकीय बिलाच्या लाभार्थ्यांना बसत आहे. पंधरा दिवसांपूर्वी लाच घेताना पकडलेल्या

वैद्यकीय देयके : लाचेत अडकलेल्याकडेच चाव्याव्यंकटेश वैष्णव ल्ल बीडजिल्हा रूग्णालयातील तुघलकी कारभाराचा फटका वैद्यकीय बिलाच्या लाभार्थ्यांना बसत आहे. पंधरा दिवसांपूर्वी लाच घेताना पकडलेल्या रूग्णालय कर्मचाऱ्यांकडून शल्य चिकित्सकांनी अद्यापही चाव्या घेतलेल्या नसल्याचे कारण पुढे केले आहे. त्यामुळे वैद्यकीय देयके मागण्यास आलेल्यांना आल्या पावली माघारी फिरावे लागत आहे.१५ दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा रूग्णालयातील हाफिज नावाच्या कर्मचाऱ्याला वैद्यकीय देयक मंजूर करतो म्हणून लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. या घटनेला पंधरा दिवस उलटून गेले. दरम्यान वैद्यकीय देयकाच्या संदर्भाने जिल्हा रूग्णालय प्रशासनाने पर्यायी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक होते. मात्र शुक्रवारपर्यंत वैद्यकीय देयके मागायला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वापस लावले जात असल्याचे चित्र पाहवयास मिळाले.आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, अंबाजोगाई तालुक्यातील इतर विभागातील कर्मचारी जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय देयकाच्या मंजूरीसाठी येतात मात्र येथे आल्यानंतर लाभार्थ्यांना वैद्यकीय देयकाबाबत कोणतीच माहिती सध्या मिळत नाही. कर्मचाऱ्यांना वैद्यकीय देयकाबाबत विचारले की, ते जिल्हा शल्य चिकित्सकांना विचारा, अशी उत्तरे देत आहेत. लाभार्थ्याला जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेण्यासाठी तासन्तास त्यांच्या दालनासमोर उभे ठाकावे लागते. भेट झाल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने लाभार्थी वैतागले आहेत. अनेकांना यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.शेकडो फाईल धूळ खात : जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्षकेवळ वैद्यकीय देयकाच्या शेकडो फाईली अनेक महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत.वैद्यकीय बिल मिळण्याबाबत आम्ही प्रस्ताव दाखल केला याचा अर्थ काय आम्ही चोर आहोत का ? असा सवालही प्रस्ताव दाखल केलेल्या लाभार्थ्यांनी उपस्थित केला.तीन ते चार महिन्यांपेक्षा अधिक काळापासून प्रस्ताव प्रलंबित ठेवण्याचा ‘अर्थ’ काय ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.वैद्यकीय देयकाच्या विभागाचा चार्ज घेण्यास एकही कर्मचारी तयार होत नाही. याबाबत चार्ज नको म्हणून कर्मचारी लेखी देत आहेत. मी देखील कोणाला जबरदस्तीने जार्ज देऊ शकत नाही.- डॉ. अशोक बोल्डेजिल्हा शल्यचिकित्सक