शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

अटकेतील चौघांवर गंभीर गुन्हे

By admin | Updated: July 7, 2014 00:14 IST

कळंब : तालुक्यातील मस्सा खंडेश्वरी गावाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात गुन्हेगारांना कळंब पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गजाआड केले होते.

कळंब : तालुक्यातील मस्सा खंडेश्वरी गावाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात गुन्हेगारांना कळंब पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गजाआड केले होते. यातील चौघांविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणच्या पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती कळंब पोलिसांकडून मिळाली आहे. गुरुवारी रात्री मस्सा खं. गावाजवळील मनुष्यबळ योजना पाटीलच्या लगत असलेल्या एका रोपवाटिकेत सात गुन्हेगार दबा धरून बसले असताना कळंब पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना गजाआड केले होते. त्यांच्याजवळ सापडलेल्या लोखंडी कटावणी, मिरची पूड, चाकू आदी साहित्यावरून त्यांचा एखाद्या ठिकाणी अपराध करण्याचा मनसुबा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अटक केलेल्या दत्ता उमराव शिंदे, बरी बप्पा पवार, सुनील छगन काळे, अनिल उर्फ भरण्या शिंदे, अर्जुन सुब्राव पवार, सुनील शहाजी चव्हाण, सुरेश माणिक पवार, यांच्यापैकी वाकडी येथील सुनील छगन काळे यांच्याविरुद्ध उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे चार गुन्हे दाखल आहेत. याशिवाय अनिल उर्फ भरण्या उमराव शिंदे यांच्याविरुद्ध दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील सुरेश माणिक पवार याच्यावर बीड जिल्ह्यातील धारूर, गेवराई, अंबाजोगाई (ग्रा.) या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. यावरून कळंब पोलिसांनी शिताफीने पकडलेले हे सात जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी वेळीच मुसक्या आवळल्याने या दबा धरून बसलेल्या गुन्हेगारांच्या संभाव्य कृतीस पायबंद बसून पुढील अनर्थ टळलेला आहे. या व्यक्तीच्या चौकशीतून अनेक गुन्हे उघडकीस येऊ शकतात. या सातही आरोपींना शुक्रवारी कळंब येथील न्यायालयासमोर हजर केला असता, न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोनि चंद्रकांत सावळे, सपोनि आर. डी. पांचाळ यांनी सांगितले. (वार्ताहर)