शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

डाळींब उत्पादक बनले विक्रेते

By admin | Updated: August 29, 2014 01:28 IST

केदारखेडा : येथून जवळच असलेल्या वालसा डावरगाव येथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारात भाव मिळत नसल्याने त्यांनी थेट रस्त्यावर दुकाने थाटून विक्री सुरु केली आहे.

केदारखेडा : येथून जवळच असलेल्या वालसा डावरगाव येथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारात भाव मिळत नसल्याने त्यांनी थेट रस्त्यावर दुकाने थाटून विक्री सुरु केली आहे.सूर्यकांत संतुकराव वाघ तसेच इतरांनी किरकोळ डाळिंब विक्रीची दुकान केदारखेडा-भोकरदन रस्त्यावरील वनिकरणमध्ये थाटले आहे़ वाघ यांनी अडीच एकर क्षेत्रावर ८५0 डाळिंबाचे झाडे शेततळ्यावरील पाण्यावर जोपसली आहे़ या डाळिंबाच्या क्षेत्रावर मेहनत घेऊन बाग जोपासली. आजरोजी मोठ्या प्रमाणात फळे लगडली आहेत. परंतु हा माल बाजारात ठोक विक्रीसाठी नेला असता व्यापाऱ्यांकडून माती मोल भावाने खरेदी होत आहे. हा भाव शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेतकरी हातबल झाला आहे. त्यातच यंदा पावसाळ्यात प्रारंभी पाऊस पडला नाही़ नंतर आलेल्या पावसात हवा जास्त असल्याने झाडांना लागलेल्या फळगळ झाली. मोठे नुकसान झाले.यामुळे वाघ यांनी बाजारपेठ उभी करण्याचा निर्णय घेतला़ केदारखेडा-भोकरदन मुख्य रस्त्यावरील वनिकरण मध्ये किरकोळ डाळिंब विक्रीची दुकान गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांनी थाटली़ शेतकऱ्यांच्या या निर्णयाला ग्राहकही चांगला प्रतिसाद देत आहेत. डाळिंब विक्रीच्या या किरकोळ दुकानावर मुख्य रस्त्याने जाणारे -येणारे दुचाकी,चारचाकीसह ट्रकचालक या डाळिंबाचा येथे थांबून खरेदी करीत आहेत. काही ट्रकचालक तर दहा ते पंधरा किलो डाळिंब एकाच वेळी खरेदी करीत आहेत. या ठिकाणी दररोज शेतकऱ्यांच्या या दुकानावरुन १५0 ते १६0 किलो डाळिंबाची विक्री होत आहे़ ५0 ते ६0 रुपये किलो प्रमाणे विकल्या जाणाऱ्या या डाळिंबापासून शेतकऱ्याला दररोज ९ते १0 हजार रुपये मिळत आहे़ या शेतकऱ्यांचा आदर्श आणखी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी घेतल्यास त्याचा नक्कीच फायदा शेतकऱ्यांना होईल हे विशेष़ याविषयी वाघ यांनी सांगितले की, यंदा डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आले आहे. यातुलनेत मिळणारा भाव अत्यल्प असल्याने सर्वच उत्पादक धास्तावले आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव रस्त्यावर विक्री करावी लागत आहे. भाववाढीची प्रतीक्षा आहे. (वार्ताहर)लोकमतशी बोलताना सूर्यकांत वाघ यांनी सांगितले की, या मालाला बाजारपेठेत अत्यंत कमी भाव मिळत आहे़बाजारात मालाची आवक अधिक झाल्याने व्यापाऱ्यांनी त्यांचा पुरेपूर फायदा घेतला आहे. व्यापारी मालाची कवडीमोल भावाने ते खरेदी करीत आहे़४डाळिंब जोपासण्याची वेळी या मालाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा असताना अपेक्षा भंग झाल्याने आमच्या मालाची विक्री आम्हीच ठरवू. असा निर्धार करुन हे दुकान थाटले़ आम्ही दोन भाऊ आहोत. धाकट्या भावाकडे सुध्दा अडीच एकर डाळींब बाग असल्याने या पूर्ण मालाची आता मात्र ठोक डाळिंब विक्रीची आवश्कता नसून किरकोळ दुकानावरच या मालाची विक्री करेल असा ठाम विश्वास शेवटी वाघ यांनी व्यक्त केला़