‘कॅश सेक्शन’ची सुरक्षा धोक्यात !

By Admin | Updated: July 12, 2015 00:17 IST2015-07-12T00:09:23+5:302015-07-12T00:17:14+5:30

बीड : येथील आगारातील कॅश सेक्शनची सुरक्षा सध्या धोक्यात असल्याचे स्पष्ट दिसून येते. या विभागाच्या बाजूची संरक्षक भिंत तुटली आहे. सर्व परिसर मोकळा झाला आहे.

Security of cash section is in danger! | ‘कॅश सेक्शन’ची सुरक्षा धोक्यात !

‘कॅश सेक्शन’ची सुरक्षा धोक्यात !


बीड : येथील आगारातील कॅश सेक्शनची सुरक्षा सध्या धोक्यात असल्याचे स्पष्ट दिसून येते. या विभागाच्या बाजूची संरक्षक भिंत तुटली आहे. सर्व परिसर मोकळा झाला आहे. यामुळे येथे अनोळखी लोकांचा वावर वाढला आहे.
बसस्थानकाच्या पाठीमागून मिनी बायपासचे काम सुरू आहे. हा बायपास कॅश सेक्शन आणि आगाराच्या मधून जातो. हे काम करताना कॅश सेक्शनला असलेले कंपाऊंड तोडण्यात आले. तब्बल दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही हे काम पूर्ण झालेले नाही. याचा परिणाम कॅश सेक्शनवर होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या ठिकाणी दररोज लाखो रूपयांची आवक असते. त्यामुळे जमा होणाऱ्या रकमेची सुरक्षा रामभरोसे आहे.
कंपाऊंड तोडल्यामुळे कॅश सेक्शन परिसरात अनोळखी लोकांचा वावर वाढला आहे. कर्मचारी की प्रवासी हे ओळखणेही सुरक्षा रक्षकांना कठीण बनले आहे. दिवसा तर एकही सुरक्षा रक्षक येथे नसतो. रात्री एकाच सुरक्षारक्षकावर येथील जबाबदारी असते. एसटीचा एक सुरक्षारक्षक आत व बाहेर जाणाऱ्या गाड्यांची नोंदणी करण्यात व्यस्त असतात. त्यामुळे कॅश सेक्शनकडे लक्ष देण्यास अधिकाऱ्यांना वेळ नसल्याचे दिसून येते.
याबाबत सुरक्षा व दक्षता अधिकारी पाटील म्हणाले, रात्रीला तीन सुरक्षारक्षक असतात. दिवसा येथे कर्मचाऱ्यांचा वावर असल्यामुळे सुरक्षेची गरज नाही. सुरक्षेसंदर्भात वरिष्ठांना रिपोर्ट कळविला आहे, असे ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Security of cash section is in danger!