शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

रबीसाठीचे दुसरे आवर्तन अडचणीत

By admin | Updated: December 1, 2014 01:27 IST

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून रबी पिकांसाठी दोन आवर्तने देण्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले होते; परंतु गोदावरीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडावे लागल्यामुळे आणि परळी थर्मलसाठी पाणी द्यावे लागणार

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून रबी पिकांसाठी दोन आवर्तने देण्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले होते; परंतु गोदावरीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडावे लागल्यामुळे आणि परळी थर्मलसाठी पाणी द्यावे लागणार असल्यामुळे आता शेतीसाठी दुसरे आवर्तन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. जुलैपर्यंतची गरज भागवून धरणाच्या उपयुक्त साठ्यात केवळ ७० दलघमी पाणीच शिल्लक राहणार आहे, तर दुसऱ्या आवर्तनासाठी किमान ११० दलघमी पाणी लागणार आहे. त्यामुळे वरच्या भागातील धरणांमधून पाणी आले तरच शेतीला दुसरे आवर्तन मिळू शकेल, असे कडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जायकवाडी धरणामुळे औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. यंदा जायकवाडी धरणात पावसाळ्याच्या शेवटी ४४ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे जलसंपदा विभागाने जायकवाडीतून रबी हंगामासाठी दोन पाणी पाळ्या (आवर्तन) देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात पहिले आवर्तन देण्यात आले. दरम्यान, आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यांत नागरिकांच्या मागणीनुसार १५ दलघमी पाणी सोडावे लागले. याशिवाय आगामी काळात परळी थर्मललाही पाणी देण्याची गरज भासणार आहे. जायकवाडीत आजघडीला २८.४१ टक्के म्हणजे ६१६ दलघमी पाणी आहे. जुलै २०१५ पर्यंतची पिण्याच्या पाण्याची गरज, औद्योगिक पाणी वापर आणि होणारे बाष्पीभवन यासाठी ४८० दलघमी पाणी लागणार आहे. यंदा माजलगाव धरणात पाणी राहिलेले नाही.