छत्रपती संभाजीनगरमध्ये ४१.६ अंशांच्या तडाख्याने रस्ते ओस, नागरिकांनो आरोग्य सांभाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 19:03 IST2026-04-18T18:59:16+5:302026-04-18T19:03:51+5:30

वाढत्या उष्णतेमुळे दुपारी रस्ते ओस पडत असून नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Scorching Heat! Chhatrapati Sambhajinagar Records 41.6 Degrees as Summer Intensifies | छत्रपती संभाजीनगरमध्ये ४१.६ अंशांच्या तडाख्याने रस्ते ओस, नागरिकांनो आरोग्य सांभाळा!

छत्रपती संभाजीनगरमध्ये ४१.६ अंशांच्या तडाख्याने रस्ते ओस, नागरिकांनो आरोग्य सांभाळा!

छत्रपती संभाजीनगर: शहरात गेल्या चार दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत असून शुक्रवारी (१७ एप्रिल) कमाल तापमानाने ४१.६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. हे यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च तापमान ठरले आहे. वाढत्या उष्णतेमुळे दुपारी रस्ते ओस पडत असून नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वाढता पारा आणि उष्मा
हवामान विभागाच्या नोंदीनुसार, या आठवड्यात सोमवारपासून तापमानाचा कल वाढता राहिला आहे. १३ एप्रिल रोजी पारा ४१.२ अंशांवर होता, जो शुक्रवारी ४१.६ वर पोहोचला. किमान तापमानही २३.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, रात्रीच्या वेळीही उकाडा जाणवत आहे. बुधवारी तापमानात किंचित घट झाली असली तरी उष्म्याची तीव्रता कायम होती.

आठवडाभराचा 'हिट' रिपोर्ट
गेल्या सात दिवसांतील आकडेवारी पाहता, शहर सलग उष्णतेच्या लाटेच्या छायेत असल्याचे दिसते. विशेषतः १३, १४, १६ आणि १७ एप्रिल रोजी तापमान ४१ अंशांच्या वर राहिल्याने यंदाचा उन्हाळा अधिक कडक जाण्याचे संकेत मिळत आहेत.

दिनांक .... कमाल तापमान
१२ एप्रिल ... ४०.४
१३ एप्रिल ... ४१.२
१४ एप्रिल ... ४१.४
१५ एप्रिल ... ४०.८
१६ एप्रिल .... ४१.४
१७ एप्रिल ..... ४१.६

Web Title : औरंगाबाद में भीषण गर्मी: 41.6°C तापमान, सड़कें खाली, स्वास्थ्य सलाह!

Web Summary : औरंगाबाद भीषण गर्मी की चपेट में, तापमान 41.6°C तक पहुंचा, जो इस गर्मी में सबसे अधिक है। दिन में सड़कें सुनसान हैं। 13 अप्रैल से तापमान लगातार बढ़ रहा है, रात में भी राहत नहीं है। नागरिकों को सावधानी बरतने की सलाह दी जाती है।

Web Title : Aurangabad Scorches: 41.6°C Heatwave empties streets, health advisory issued.

Web Summary : Aurangabad grapples with a severe heatwave, hitting 41.6°C, the highest this summer. Streets are deserted during the day. Temperatures have consistently risen since April 13th, with little respite at night. Citizens are advised to take precautions.