पालिका शाळांमध्ये सर्व सुविधा देणार

By Admin | Updated: June 19, 2014 00:22 IST2014-06-19T00:11:47+5:302014-06-19T00:22:55+5:30

जालना : शहरातील पालिकेच्या सर्व शाळांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी मंगळवारी दिले.

The schools will provide all facilities in the schools | पालिका शाळांमध्ये सर्व सुविधा देणार

पालिका शाळांमध्ये सर्व सुविधा देणार

जालना : शहरातील पालिकेच्या सर्व शाळांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी मंगळवारी दिले.
पालिकेच्या कार्यालयात सात तासांच्या दीर्घ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. जालना शहरात नगरपालिकेच्या एकूण २१ शाळा आहेत. प्रत्येक शाळेत संगणक कक्ष अद्ययावत करण्याची सूचना देण्यात आली. सर्वशिक्षा अभियानच्या १० बाबींनुसार या शाळांमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. यावर्षी या शाळांमध्ये किती विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला, याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी मागविली आहे. मोफत पाठ्यपुस्तके वितरण पूर्णपणे झाले का, याचीही त्यांनी माहिती घेतली.
२०९ वाहनांचा प्रस्ताव
पालिकेची अनेक वाहने नादुरूस्त, बंद आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन २०९ वाहनांची गरज आहे. याबाबतचा प्रस्ताव विभागीय नगरपालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आलेला आहे. पालिकेची रेकॉर्डरूम अद्ययावत ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. तेथे पेपरलेस काम व्हावे. याशिवाय बांधकाम विभागाला पालिकेची खुली जागा, रस्ते आणि इमारती याबाबतची अद्ययावत माहिती असलेले तीन रजिस्टर ठेवण्याची सूचना करण्यात आली. (प्रतिनिधी)
कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती
नगरपालिकेतील विभागनिहाय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या स्टाफची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. एक-दोन विभाग वगळता सर्वच विभागांमध्ये मंजूर पदांपेक्षा कार्यरत कर्मचारी संख्या कमी आहे. त्यामुळे काही ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात येणार आहे. काही सफाई कामगार महसूल अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी किंवा अन्यत्र कामावर आहेत. त्यांना परत सफाईच्या कामावर नियुक्त करण्यात येणार आहे.

Web Title: The schools will provide all facilities in the schools