शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची होतेय हेळसांड

By admin | Updated: September 11, 2014 00:23 IST

व्यंकटेश वैष्णव, बीड मासावर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज आॅनलाईन दाखल करतेवेळी विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

व्यंकटेश वैष्णव, बीडमासावर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज आॅनलाईन दाखल करतेवेळी विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील चार-पाच दिवसांपासून शिष्यवृत्तीची आॅनलाईन प्रक्रिया बंद असल्याने बारावी ते पदव्युत्तर पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारताना महाविद्यालय व विशेष समाज कल्याण विभागाच्या कामात सुसूत्रता यावी, या उद्देशाने महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाच्या वतीने एक संकेतस्थळ निर्माण करण्यात आले आहे़ मागील दोन वर्षांपासून सर्व प्रवर्गातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज भरावा लागत आहे. या आॅनलाईन प्रणालीचे कंत्राट 'मास्टेक' या कंपनीला दिलेले असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले़जिल्ह्यात सर्व प्रवर्गातील एकूण ४८ हजार विद्यार्थी आहेत. आतापर्यंत २० ते २२ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरलेले असले तरी अद्याप अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थींनी आॅनलाईन अर्ज भरलेले नाहीत. विद्यार्थ्यांना शासनाच्या आॅनलाईन प्रणालीच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत विशेष समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त आर. एम. शिंदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही संबंधित कंपनी व सामाजिक न्याय विभाग, पुणे यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. पुढील दोन दिवसात शिष्यवृत्ती आॅनलाईन प्रणाली सुरळीत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले़अर्ज आॅनलाईन प्रक्रियेतील अडथळेशिष्यवृत्तीधारक विद्यार्थी सर्व कागदपत्रे घेऊन इंटरनेट कॅफेवर जातात. काहीवेळा संकेतस्थळ उघडते़ पुढे महाविद्यालयाची यादी ‘स्क्रिनवर’ दिसत नाही. बँकेचे खाते सुरू होत नाही. तसेच संबंधित महाविद्यालयातील अभ्यासक्रम दिसत नाहीत.अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी विद्यार्थ्यांना मागील पाच दिवसापासून सुरू आहेत़ याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल वाईकर यांनी केला आहे़ तात्काळ शिष्यवृत्ती प्रणाली सुरळीत करण्याची मागणी केली आहे.