शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

तोट्या बसविल्यास ३ दशलक्ष लिटर्स पाण्याची बचत

By admin | Updated: October 30, 2014 00:27 IST

लातूर : कमी पर्जन्यमानामुळे लातूर शहरासह जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे संकट आले आहे. आज जागतिक काटकसर दिन आहे. कुटुंब कबिला चालविण्यासाठी जशी काटकसर केली जाते,

लातूर : कमी पर्जन्यमानामुळे लातूर शहरासह जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे संकट आले आहे. आज जागतिक काटकसर दिन आहे. कुटुंब कबिला चालविण्यासाठी जशी काटकसर केली जाते, तशी काटकसर पाण्याचा वापर करताना केल्यास लातूरला शहरात दररोज ५ दशलक्ष लिटर्स पाण्याची बचत होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शिवाय, लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरण यंत्रणेनेही याला दुजोरा दिला आहे. नळाला तोट्या बसविल्यास ३ दशलक्ष लिटर्स आणि लिकेजवर नियंत्रण ठेवल्यास २ दशलक्ष लिटर्स असे एकूण ५ दशलक्ष लिटर्स दररोज पाण्याची बचत होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.लातूर शहराला दररोज ३० ते ३२ दशलक्ष लिटर्स पिण्याचे पाणी लागते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठ्याची योजना सुरू असून, सध्या शहराला आठ दिवसांआड पाणी सोडण्यात येत असले, तरी ३० ते ३२ दशलक्ष लिटर्स या दैनंदिन गरजेनुसार पाणी देण्यात येते. शहरात ४२ हजार ५०० अधिकृत नळधारक आहेत. तर दोन ते तीन हजार अनाधिकृत नळधारकांची संख्या आहे. त्यांचे एक कनेक्शन अधिकृत तर दुसरे अनधिकृत आहे. ज्या नळधारकांचे मुख्य जलवाहिनीवर कनेक्शन आहे, त्यांच्या नळाला तोट्या असणे आवश्यकच आहे. तोट्या नसल्यामुळे बेसुमार पाण्याचा वापर होतो. शिवाय, रस्त्यावर आणि प्रांगणात सडा टाकून पाणी वाया घालविले जाते. यात किमान हजारो लिटर्स पाण्याची नासाडी होते. हा अनुभव प्राधिकरणाचा आहे. आवश्यक पाणी घेऊन नळाच्या तोट्या बंद कराव्यात. त्यामुळे मोठ्या दाबाने खालच्या ग्राहकांनाही नियमानुसार पाणी मिळेल. परंतु, असे होत नाही. पिण्याचे पाणी भरल्यानंतरही ग्राहकांकडून नासाडी होते. यात दिवसाचा विचार केला तर तीन दशलक्ष लिटर्स पाण्याची नासाडी होते. त्यामुळे दैनंदिन गरजेनुसार ३० ते ३२ दशलक्ष लिटर्स पाणी आठ दिवसांआड सोडत असलो तरी यात वाया जाण्याचे प्रमाण ३ दशलक्ष लिटर्स आहे, असे जीवन प्राधिकरणाचे अभियंता रमेश सोनकांबळे यांनी सांगितले. दरम्यान, ३ दशलक्ष लिटर्स पाणी आपण बचत करू शकतो. तसे नागरिकांनी ठरविण्याची गरज आहे.जलवाहिन्यांच्या लिकेजमुळे २ दशलक्ष लिटर्स पाणी वाया जाते, असे काही नागरिकांचे म्हणणे असले, तरी पाणीपुरवठ्याची जबाबदारी जीवन प्राधिकरणाकडे आल्यापासून आम्ही जलवाहिन्यांच्या लिकेजवर नियंत्रण ठेवले आहे. लिकेज दिसताच ते दुरुस्त करून पाणी वाया जाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण आणले असल्याची कार्यकारी अभियंता सोनकांबळे यांनी सांगितले.