शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

जप्त केलेल्या रेमडेसिविरच्या ८० रिकाम्या बाटल्या व इंजेक्शनचे २७ खोके जतन करा- खंडपीठाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:05 IST

औरंगाबाद : अहमदनगर मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला होता. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान ...

औरंगाबाद : अहमदनगर मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला होता. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान जप्त केलेल्या रेमडेसिविरच्या ८० रिकाम्या बाटल्या व इंजेक्शनचे २७ खोके पुढील आदेशापर्यंत जतन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव आणि न्या. एस.जी. डिगे यांनी पोलिसांना दिले आहेत. याचिकेची पुढील सुनावणी १७ ऑगस्टला होणार आहे.

याचिकेची पार्श्वभूमी

खासदार डॉ. सुजय विखे यांनी त्यांच्या मैत्रीचा फायदा घेऊन थेट विशेष विमानाने शिर्डी विमानतळावर रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा आणला होता. या साठ्याच्या वाटपाची माहिती त्यांनी व्हिडिओ चित्रफितीद्वारे सामाज माध्यमांमार्फत प्रसारित केली होती. तो रेमडेसिविरचा साठा कोठून आणला हे त्यांनी जाहीर केले नव्हते. यातील इंजेक्शन त्यांनी साईबाबा संस्थान, प्रवरा मेडिकल ट्रस्ट, सिव्हिल हॉस्पिटल व राहता येथील सरकारी दवाखान्याला देखील वाटप केले होते. कोणताही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना डॉ. सुजय यांनी गोपनीय व्यक्तीकडून किंवा काळ्या बाजारातून रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी केले असावेत.

हा इंजेक्शनचा साठा भेसळ मुक्त व शुद्ध आहे, असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही. एवढा मोठा रेमडेसिविर इंजेक्शनचा

साठा कुठे व कसा वापरला याचा हिशेब देखील कुठे नाही, या मुद्द्यांवर सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार व बाळासाहेब विखे यांनी यापूर्वी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती.

कोणतीही कारवाई झाली नाही

खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा आधार घेत पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर देखील पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने याचिकाकर्ते यांनी ॲड. सतीश तळेकर यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. प्रज्ञा तळेकर, ॲड. अजिंक्य काळे, ॲड. उमाकांत आवटे व ॲड. राजेश मेवारा काम पाहत आहेत. शासनाच्या वतीने विशेष सरकारी वकील अहाद पोंडा आणि मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे काम पाहत आहेत.