"संस्कारांमध्ये आहे देश बदलण्याची ताकद"; पर्यूषण पर्वात साध्वी आराधनाश्रीजींचे मौलिक विचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 12:15 IST2025-08-25T12:12:25+5:302025-08-25T12:15:17+5:30
वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन दक्षिणमध्य श्रावक संघाच्यावतीने दशमेशनगरात आयोजित पर्यूषण पर्वात साध्वी आराधनाश्री म.सा व अवंतीश्री म.सा. यांनी मार्गदर्शन केले

"संस्कारांमध्ये आहे देश बदलण्याची ताकद"; पर्यूषण पर्वात साध्वी आराधनाश्रीजींचे मौलिक विचार
छत्रपती संभाजीनगर : संस्कार आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणतात. संस्कारश्रम समाज आणि समूहामुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर संघ समाज आणि राष्ट्रात शांती निर्माण होऊ शकते, एवढी ताकद संस्कारामध्ये असते, असा हितोपदेश साध्वी आराधनाश्रीजी म.सा. यांनी येथे केला.
वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन दक्षिणमध्य श्रावक संघाच्या वतीने दशमेशनगरात पर्यूषण पर्व सुरू आहे. साध्वीजी आराधनाश्री म.सा. व अवंतीश्री म.सा आदीठाणा २ यांचे मार्गदर्शन येथे लाभत आहे. यानिमित्त सकाळी ८:१५ वाजता अंतगढसूत्र वाचन, ९:१५ वाजता प्रवचन, दुपारी २:३० वाजता कल्पसूत्रवाचन, ३.३० वाजता स्पर्धा, सायंकाळी ६.३० वाजता प्रतिक्रमण असे दैनंदिन कार्यक्रम होत आहेत. विशेष म्हणजे अंतगढसूत्र आणि प्रतिकमणाच्या वेळी धार्मिक प्रश्न विचारले जात आहे. अचूक उत्तर देणाऱ्या भाविकांना सोडतीद्वारे बक्षीसही दिले जात आहे. पर्यूषण पर्व यशस्वितेसाठी श्री संघाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
पर्यूषण पर्वाअंतर्गत सोमवारी (दि.२५) ‘आ अब लौट चले’, मंगळवारी (दि.२६) ‘धर्म संस्कारों पर टीका है’ तर बुधवारी (दि.२७) ‘छुम छुम बाजे पायलिया’ याविषयावर प्रवचन होणार आहे. गुरुवारी (दि.२८) क्षमापणा महापर्व व पारणाने या पर्यूषण पर्वाची सांगता होणार आहे.