शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये लाळेचे नमुने बंद; नाकातून कोरोना टेस्टचे नमुने घेणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 13:31 IST

बाजारपेठेत गरजेपेक्षा जास्त वर्दळ वाढू लागली. सायंकाळी पाच नंतरही नागरिक नियमांचे पालन न करता घराबाहेर पडत आहेत.

ठळक मुद्देदररोज घेतले जात आहेत ५०० पेक्षा अधिक नमुने शहरात आठ ठिकाणी कोरोना टेस्टसाठी नमुने घेतले जातील.

औरंगाबाद : कोरोनाचा समूह संसर्ग वाढू नये म्हणून महापालिकेने संशयित रुग्ण तपासणीवर मागील दोन-तीन दिवसांपासून सर्वाधिक भर दिला आहे. त्यात  वाढ करावी, अशा सूचना प्रशासनाने आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत आणखी मोठ्या प्रमाणात भर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पालिका प्रशासनाने त्यादृष्टीने कोविड केअर सेंटरची संख्या वाढविली आहे. 

महाराष्ट्र शासनाने १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सुरुवात केली. बाजारपेठेत गरजेपेक्षा जास्त वर्दळ वाढू लागली. सायंकाळी पाच नंतरही नागरिक नियमांचे पालन न करता घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे मागील एक महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.  कोरोना रुग्णांची ही वाढ समूह संसर्गाकडे नेणारी आहे. शहरातील एक हजार वसाहतींमध्ये कोरोनाने हातपाय पसरले. दररोज अडीचशे- तीनशे रुग्ण सापडत असल्याने चिंता वाढू लागली आहे.  शहरात आठ ठिकाणी कोरोना टेस्टसाठी नमुने घेतले जातील. एका मोबाईल टीमची नियुक्ती केली. यात आणखी वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी पाण्डेय यांनी घेतला. दहा मोबाईल टीम शहर बस घेऊन फिरणार आहे. एका बसमध्ये आरोग्य विभागाचे पाच कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यानंतर कोरोना टेस्टची संख्या दुपटीने वाढेल. रुग्णसंख्याही दुप्पट होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटर, अलगीकरण कक्षांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

२ पद्धतीने नमुने घेण्याची पद्धत संशयित कोरोना रुग्णाची तपासणी करताना पूर्वी घशातील लाळेचे नमुने, तसेच नाकातून नमुने घेण्यात येत होते. यातील एक पद्धत महापालिकेने बंद केली आहे. आता फक्त नाकाद्वारे नमुने घेण्यात येत आहेत. यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी नमूद केले की, लाळेच्या नमुन्यापेक्षा नाकातील नमुने अधिक प्रभावी ठरत असल्यामुळे ही पद्धत अवलंबिण्यात आली आहे.

शहरी भागात घेण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या२५ जून - ३१५२६ जून - ३८६२७ जून - ४४४२८ जून - ३८६२९ जून - ५२६३० जून - ५०६०१ जुलै- ६३६ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद