शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकासची धुरा पहिल्यांदाच बीडकडे !

By admin | Updated: November 3, 2014 00:40 IST

संजय तिपाले ,बीड राज्याच्या राजकारणावर कायम दबदबा राखणाऱ्या बीडच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली; परंतु ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद एकदाही मिळाले नव्हते.

संजय तिपाले ,बीडराज्याच्या राजकारणावर कायम दबदबा राखणाऱ्या बीडच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली; परंतु ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद एकदाही मिळाले नव्हते. रविवारी पंकजा मुंडे यांच्यामुळे हे खाते बीडकडे आले. राज्यमंत्रीपदाचा प्रवास न करता थेट कॅबिनेट मंत्री होण्याची संधी यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांना मिळाली होती. योगायोग असा की, मुंडेंनतर त्यांच्या कन्या पंकजा यांनीच हा मान मिळविला आहे.सुंदरराव सोळंके हे जिल्ह्यातील पहिले कॅबिनेट मंत्री. १९७५ ते १९७७ या दरम्यान त्यांनी उद्योग व सार्वजनिक खात्याची जबाबदारी पेलली होती. नंतर ते उपमुख्यमंत्रीही झाले होते. त्यानंतर हा मान मिळाला गोपीनाथ मुंडे यांना. १९९५ ते ९९ या कालावधीत ते युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. २००३ ते २००९ या दरम्यान विमल मुंदडा यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान मिळविले. २००३ ते २००४ मध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले. पुढे २००९ ते २०१४ मध्येही त्यांना हा मान मिळाला. आता पंकजा मुंडे यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत कॅबिनेट मंत्री म्हणून जिल्ह्यातील चार नेत्यांनी मोहोर उमटवली होती. पंकजांमुळे जिल्ह्याकडे पाचव्यांदा कॅबिनेट मंत्रीपद आले आहे. सुंदरराव सोळंके, विमल मुंदडा, जयदत्त क्षीरसागर या मातब्बरांना आमदार, राज्यमंत्री असा प्रवास पूर्ण करुन कॅबिनेट मिळाले होते. गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे हे पिता आणि लेक याला अपवाद आहेत. त्या दोघांनीही आमदार ते थेट कॅबिनेट असा पल्ला गाठला.ग्रामविकासाचे स्वप्न होणार साकार!गोपीनाथराव मुंडे यांची नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात ग्रामविकासमंत्री म्हणून वर्णी लागली होती. मात्र, मुंडे यांचे निधन झाल्याने त्यांनी पाहिलेले स्वप्न अधुरेच राहिले होते. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांच्या कन्या पंकजा यांच्याकडे ग्रामविकास हेच खाते आले आहे. त्यामुळे पित्याचे स्वप्न साकार करण्याची संधी पंकजा यांना मिळाली आहे.