रुबिना जमादार हिला राष्ट्रीय स्पर्धेत कास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:35 IST2018-01-16T00:34:54+5:302018-01-16T00:35:03+5:30

नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ६२ व्या शालेय राष्ट्रीय शिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाची विद्यार्थिनी रुबिना जमादार हिने कास्यपदक जिंकले.

 Rubina Jamadar gets national competition bronze | रुबिना जमादार हिला राष्ट्रीय स्पर्धेत कास्य

रुबिना जमादार हिला राष्ट्रीय स्पर्धेत कास्य

औरंगाबाद : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ६२ व्या शालेय राष्ट्रीय शिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाची विद्यार्थिनी रुबिना जमादार हिने कास्यपदक जिंकले. याआधी तिने नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताना राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातील प्रवेश निश्चित केला होता. रुबिना जमादार हिला क्रीडा विभागप्रमुख प्रा. एकनाथ साळुंके, रफिक जमादार, प्रा. अविनाश वाडे, शेख शफिक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल म. शि. प्र. मंडळाचे सरचिटणीस आ. सतीश चव्हाण, स्थानिक नियामक मंडळ सदस्य पंडितराव हर्षे, अ‍ॅड. मोहनराव सावंत, त्रिंबकराव पाथ्रीकर, प्राचार्य शिवाजीराव थोरे, उपप्राचार्य अशोक तेजनकर, रजनीकांत गरुड, संभाजी कमानदार, प्रदीप सोळुंके आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.

Web Title:  Rubina Jamadar gets national competition bronze