शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रस्ते अंधारातच; प्रशासन निद्रिस्त

By admin | Updated: October 30, 2014 00:30 IST

औरंगाबाद :अंतर्गत राजकारण आणि ११२ कोटी रुपयांच्या पथदिव्यांच्या निविदेवर कोर्टाने ओढलेले ताशेरे. यामुळे शहरातील सर्व मुख्य रस्ते अंधारात गेले

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाची बेफिकिरी, सत्ताधारी शिवसेना- भाजपा पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत राजकारण आणि ११२ कोटी रुपयांच्या पथदिव्यांच्या निविदेवर कोर्टाने ओढलेले ताशेरे. यामुळे शहरातील सर्व मुख्य रस्ते अंधारात गेले आहेत. प्रशासनातील जबाबदार अधिकारी पदाधिकाऱ्यांना जुमानत नाहीत. पथदिव्यांचे काम पाहणारी विनवॉक ही कंपनी पालिका प्रशासनाला दाद देत नाही, तर वॉर्डातील अंतर्गत पथदिव्यांचे काम करणारे कंत्राटदारही हताश झालेले आहेत. अशा सगळ्या कचाट्यात पथदिव्यांचा प्रकाश अडकला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील पथदिवे दिवाळीतही बंद होते. ते अजून सुरू झालेले नाहीत. दिवाळीच्या सणात रस्ते अंधारातच होते. तरीही पथदिव्यांकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे. पथदिव्यांसाठी ११२ कोटी रुपयांतून बीओटीवर मनपाने कंत्राट दिले होते. त्या कंत्राटात अनेक त्रुटी असल्यामुळे कोर्टाने त्यावर ताशेरे ओढले आहेत. ११२ कोटी रुपयांचे कंत्राट इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टीम्स प्रा.लि. आणि पॅरागॉन केबल इंडिया या संस्थेला दिले होती. त्या कंपनीने आता सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जुन्या विनवॉक कंपनीकडून सर्व पथदिवे सुरू करून घेतल्यानंतरच वरील कंपनी काम सुरू करील. ११ नोव्हेंबरपर्यंत विनवॉक कंपनीला मुदत दिली आहे. मात्र, ती कंपनीही काम करीत नाही. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बंद पथदिव्यांकडे कुणाचेही लक्ष नाही. पदाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात होते, तर अधिकारी निवडणुकीच्या कामात होते.जालना रोड, एन-५, बजरंग चौक ते बळीराम पाटील चौक, औरंगपुरा ते बाराभाई ताजिया, शहागंज ते सिटीचौक, टिळकपथ ते गुलमंडी, निराला बाजार ते जि.प. मैदानापर्यंत या मुख्य रस्त्यांवरील अनेक पथदिवे बंद आहेत, तसेच पुंडलिकनगर ते गजानन महाराज मंदिर ते शिवाजी चौक, एन-११, एन-१२, सिडकोतील रस्त्यांवर पथदिवे बंद आहेत.