शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

रस्ता १४८ किलोमीटर, काम १८२५ दिवसांपासून; औरंगाबाद ते अजिंठा महामार्ग कधी पूर्ण होणार?

By विकास राऊत | Updated: December 23, 2022 12:07 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे १ हजार ५०० कोटींतून द्विपदरीनंतर चौपदरी करण्याची घोषणा करण्यासह काम सुरू होऊन पाच वर्षे झाली आहेत.

औरंगाबाद : नोव्हेंबर २०१५ मध्ये चीनच्या उपराष्ट्रपतींनी औरंगाबाद ते अजिंठा लेणीपर्यंत वाहनाने प्रवास केल्यानंतर त्या रस्त्याची दुरवस्था दूतावासाकडे अभिप्रायासह नोंदविली. आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्यातील बांधकाम विभागाची लक्तरे टांगली गेली. १८२५ दिवसांपासून १४८ किमी रस्त्याचे काम सुरू आहे. जी-२० परिषदेनिमित्त येणारे पाहुणे अजिंठा लेण्यांना याच रस्त्याने जाणार असल्याने आता यंत्रणा पुन्हा खडबडून जागी झाली आहे. 

रस्त्याचे अजूनही २० टक्के काम शिल्लक आहे. दोन वर्षांच्या कामाला पाच वर्षे लागत आहेत. २०१६ मध्ये २५ कोटींतून तात्पुरती डागडुजी करूनही या रस्त्याचे काम झाले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे १ हजार ५०० कोटींतून द्विपदरीनंतर चौपदरी करण्याची घोषणा करण्यासह काम सुरू होऊन पाच वर्षे झाली आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग विभागाने हर्सूल टी पॉइंटपासून रस्त्याची पाहणी करून आढावा घेतला. हर्सूल ते जुना जकात नाक्यादरम्यान अडथळे आहेत. ते काम तातडीने शक्य नसल्याचे बोलले जाते. हर्सूल रुंदीकरणासाठी सोळा कोटींचा निधी अद्याप मिळालेला नाही. जी-२० पूर्वी हा रस्ता रुंद होणे गरजेचे आहे.

पाच वर्षांपासून का लागले ग्रहण?आंध्र प्रदेशच्या ऋत्विक एजन्सीने काम सोडून पोबारा केला. त्यानंतर तीन कंत्राटदारांना काम वाटून दिले. १ हजार कोटींची सुरुवातीची तरतूद होती. आता १५०० कोटींपर्यंत प्रकल्पाचा खर्च गेला. परिणामी, सिल्लोड बायपासचेही काम संथ सुरू आहे. काही ठिकाणी पुलांचे काम ठप्प आहे. निल्लोड फाटा ते सिल्लोडदरम्यान आठ किमी रस्त्याचे काम धुळे विभागाकडे आहे. ते खटोड कन्स्ट्रक्शन्सला देण्यात आले. अद्याप कामाला गती नाही. अजिंठा लेण्यांमुळे पर्यटकांसाठी जळगाव-औरंगाबाद महामार्ग महत्त्वाचा आहे. दीड हजार कोटी रुपये खर्चाचा काँक्रिट रस्ता पाच वर्षांपासून पूर्ण झालेला नाही. हर्सूल टी पॉईंटसह पुढे रुंदीकरण व अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असून, चौका, बिल्डा, सिल्लोडपर्यंत कामे सुरू आहेत. अजिंठा घाटात संरक्षण कठडे व रस्ता बांधण्याचे काम प्रलंबित आहे.

प्रशासनाच्या बैठकीत काय ठरले?१४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेला आदेश दिले. सिल्लोड ते फर्दापूर रस्त्याच्या कामास २० डिसेंबरपासून सुरुवात करावी. औरंगाबाद ते सिल्लोडपर्यंत ६ ठिकाणची कामे पूर्ण करावीत, चौका घाटातील रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रस्ताव मान्य झाला आहे, फुलंब्री येथील रस्त्यावरील काँक्रिटचे काम पूर्ण करावे, रस्त्यांवर जी-२०च्या अनुषंगाने वाहतूक नियम सूचनाफलक रेडियमसह लावणे, ३० डिसेंबरपर्यंत रस्त्याची कामे पूर्ण करावीत, आदी निर्देश आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAjantha - Elloraअजंठा वेरूळhighwayमहामार्गNitin Gadkariनितीन गडकरी