रिमझिम गाणी, झलक सुहानी गाण्यांचा कार्यक्रम

By Admin | Updated: July 30, 2015 00:20 IST2015-07-30T00:20:42+5:302015-07-30T00:20:42+5:30

जालना : लोकमत सखी मंच आणि कलर्स च्या वतीने ‘रिमझीम गाणी झलक सुहानी’ हा हिंदी व मराठी गाण्यांवर आधारित कार्यक्रम सखीमंचच्या सदस्यांसाठी

Rimzim songs, Zip Sahihani singing program | रिमझिम गाणी, झलक सुहानी गाण्यांचा कार्यक्रम

रिमझिम गाणी, झलक सुहानी गाण्यांचा कार्यक्रम


जालना : लोकमत सखी मंच आणि कलर्स च्या वतीने ‘रिमझीम गाणी झलक सुहानी’ हा हिंदी व मराठी गाण्यांवर आधारित कार्यक्रम सखीमंचच्या सदस्यांसाठी दि. १ आॅगस्ट २०१५ रोजी दुपारी ३ वाजता अंबड रोडवरील मातोश्री लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे.
सर्व लोक आतुरतेने पावसाची वाट पाहात आहे, धरतीसुध्दा पावसाने चिंब भिजण्यासाठी तळमळत आहे. पावसाची चाहूल लागताच हवेत आलेल्या गारव्यामुळे उन्हाची काहिली ओसरते.
ओल्या मातीच्या मोहक सुगंधाने मन मोहरुन जाते. मग ओठातून एखादे आवडीचे गाणे गुणगुणण्यास सुरवात होते. आपल्या आयुष्यातही नविन पावसाची सर गारवा, आपलेपणाचा ओलावा आणि सुखाची नवी हिरवळ घेवून यावी, या अनुषंगाने या सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिध्द गायक अनघा काळे, गौरव पवार, रवींद्र खोमणे हे गायक गाणी रसिकांसाठी सादर करणार आहेत. लोकमत सखीमंच सदस्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नियमित करते.
याचा भाग म्हणून महिला सदस्यांना पावसाळ्याची मेजवानी म्हणून हा खास गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भारतातील सर्वात मोठा सेलिब्रीटी डान्सशो झलक दिखला जा दर शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता कलर्स चॅनलवर सुरू आहे. आतापर्यंत न बघितलेल्या झलक दिखला जा च्या या सिझनमध्ये नवीन पिढीचा आवडता कलाकार शाहीद कपूर व कल्पक दिग्दर्शक करण जोहर, परीक्षक म्हणून डान्स गुरू गणेश हेगडे व लॉरेन गॉटलीसोबत काम बघत आहेत. ज्यामध्ये १२ सेलिब्रीटी आपल्या नृत्याचे कौशल्य दाखवित आहेत.
रिमझीम गाणी झलक सुहानि हा कार्यक्रम सखी मंच सदस्यांकरिता नि:शुल्क असून सोबत ओळखपत्र असणे आवश्यक आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल, असे संयोजकांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rimzim songs, Zip Sahihani singing program