शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा परवडतेय; पण मीटरच पडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:05 IST

बापू सोळुंके औरंगाबाद : इंधन दरवाढीमुळे नागरिकांचा स्वतंत्र वाहन वापरण्याऐवजी रिक्षा वापरण्याकडे कल दिसून येत असला तरी रिक्षात मीटरने ...

बापू सोळुंके

औरंगाबाद : इंधन दरवाढीमुळे नागरिकांचा स्वतंत्र वाहन वापरण्याऐवजी रिक्षा वापरण्याकडे कल दिसून येत असला तरी रिक्षात मीटरने प्रवास करायचा झाल्यास मीटरच बंद असल्याचे दिसून येते. शहरात आणि ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानाधारक ७० ते ८० टक्के रिक्षांचे मीटर बंद पडले आहेत. उर्वरित रिक्षांचे मीटर गायब झाले आहेत.

औरंगाबाद शहरात प्रवासी वाहतूक करण्यासाठी २५ हजार परवानाधारक रिक्षा आहेत. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसवर या रिक्षा चालतात. वर्षभरापासून या सर्व इंधनाचे दर सतत वाढत आहेत. इंधनाचे दर आणि महागाईनुसार शासनाकडून रिक्षाच्या मीटरचे भाडे ठरवून देण्यात येते. मात्र, सात ते आठ वर्षांपासून रिक्षा प्रवास भाडे दर निश्चित करण्यासाठी परिवहन आयुक्तांना वेळच मिळाला नाही. परिणामी रिक्षाचालकांनी इलेक्ट्रॉनिक मीटरऐवजी ठरावीक दराने प्रवासी वाहतूक करण्यास सुरुवात केली.

परवानाधारक रिक्षाचे दरवर्षी आरटीओ अधिकाऱ्यामार्फत परीक्षण करून फिटनेस प्रमाणपत्र घेणे रिक्षामालकास बंधनकारक आहे. चालू स्थितीत मीटर असल्याशिवाय आरटीओ अधिकारी रिक्षाची पासिंग (परवाना) करीत नाही. ही बाब लक्षात घेऊन आरटीओकडे रिक्षा पासिंगसाठी नेण्यापूर्वी मीटर सुस्थितीत असल्याची खात्री करून घेतात. वर्षभर मीटरनुसार एकाही प्रवाशाला भाडे न आकारणारे रिक्षाचालक मीटर चालू स्थितीत आणण्यासाठी मेकॅनिककडे चारशे ते पाचशे रुपये खर्च करतात. रिक्षाची पासिंग होताच बहुतेक रिक्षाचालक मीटर काढून ठेवतात. ही बाब आरटीओ अधिकाऱ्यांनाही माहिती आहे. असे असले तरी दरपत्रक निश्चित न झाल्यामुळे आरटीओ प्रशासनही रिक्षाचालकांना मीटरवर प्रवासी वाहतूक करण्यासाठी बंधन घालत नाही.

–-----–------------------

चौकट

मीटर बंद असल्याचे येते उत्तर

एखादा प्रवासी मीटरनुसार प्रवास भाडे आकारायला सांगतो तेव्हा रिक्षाचालक मीटर बंद असल्याचे उत्तर देतो. परिणामी प्रवाशाला रिक्षाचालक सांगेल तेवढे पैसे मोजून प्रवास करावा लागतो.